Pratap Sarnaik News: तब्बल १४ वर्षाच्या संघर्षपूर्ण पाठपुरावाला यश येत असून, सन २००९ मध्ये मीरा-भाईंदरवासीयांना दाखवलेले स्वप्न पूर्णत्वास येत आहे. या डिसेंबर अखेरपर्यंत दहिसर ते काशिमिरा या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून, मीरा-भाईंदरवासीयांसाठी हा एक आनंद क्षण असणार आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते दहिसर ते काशिमिरा या मेट्रो मार्गाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी बोलत होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, सन २००९ मध्ये जेव्हा या भागाचा मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो, त्यावेळी मी येथील नागरिकांना मेट्रोचे स्वप्न दाखवले होते. तत्कालीन प्रस्थापित पुढाऱ्यांनी माझ्या या घोषणेची त्यावेळी खिल्ली उडवली होती. परंतु गेल्या १४ वर्षांमध्ये सातत्याने केलेल्या पाठपुरावाला अखेर यश येताना दिसत आहे. सन २०१४ मध्ये जेव्हा युती सरकार स्थापन झाले, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते काशिमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदरवासीय मेट्रोने अंधेरी पर्यंत जाऊ शकतात. तसेच तिथून मेट्रो १ चा वापर करून एअरपोर्ट स्थानक ३ मधून थेट कुलाबापर्यंत जाऊ शकतात.
वसई-विरार मेट्रो लाईनचे काम लवकरच सुरू होणार
नवीन वर्षात मीरा-भाईंदरवासीयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक दक्षिण मुंबई तील मंत्रालय, विधान भवन येथे जाण्यासाठी मेट्रोची नेटवर्कद्वारे सुविधा उपलब्ध असणार आहे. दहिसर-काशिमिरा ही मेट्रो डिसेंबर-२०२६ पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे . त्याबरोबरच वसई-विरार मेट्रो लाईनचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई-विरार पासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक interchange ने थेट कुलाबापर्यंत मेट्रोची जाळ्यातून सेवा पुढील काही वर्षांमध्ये सुरू होऊ शकते, असा आशावाद परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, दहिसर ते काशिमिरा या नव्या मेट्रो मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे (CMRS) प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. ते मिळाल्यानंतर डिसेंबर अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शुभहस्ते या नवीन मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्याचे नियोजन येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
Web Summary : Dahisar-Kashimira Metro is set to launch by December, fulfilling a 14-year vision. Future plans include extending the line to Netaji Subhash Chandra Bose Maidan by 2026 and commencing work on the Vasai-Virar Metro line, enhancing connectivity to Mumbai.
Web Summary : दिसंबर तक दहिसर-काशीमीरा मेट्रो शुरू होगी, जो 14 साल का सपना पूरा करेगी। भविष्य में लाइन को नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान तक 2026 तक विस्तारित करने और वसई-विरार मेट्रो लाइन पर काम शुरू करने की योजना है, जिससे मुंबई से कनेक्टिविटी बढ़ेगी।