एमए, एमएससीची परीक्षा पुढे ढकलली
By Admin | Updated: April 14, 2016 01:40 IST2016-04-14T01:40:18+5:302016-04-14T01:40:18+5:30
मुंबई विद्यापीठातर्फे १८ एप्रिल रोजी होणारी कला आणि विज्ञान शाखेची पदव्युत्तर पदवी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एमए आणि एमएससीच्या चौथ्या सत्रातील परीक्षेच्या

एमए, एमएससीची परीक्षा पुढे ढकलली
मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे १८ एप्रिल रोजी होणारी कला आणि विज्ञान शाखेची पदव्युत्तर पदवी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एमए आणि एमएससीच्या चौथ्या सत्रातील परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केल्याचे विद्यापीठाने सांगितले. दोन्ही पदवी अभ्यासक्रमांची १८ एप्रिल रोजी होणारी परीक्षा ३ मे रोजी होणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी दिली आहे.