Join us

मुंबईची लूट करून कंत्राटदारांवर उधळपट्टी; आदित्य यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 05:41 IST

मुंबईची लूट करायची आणि कंत्राटदारांवर उधळपट्टी करायची, असे सरकारचे काम सुरू आहे, अशी टीका उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.

मुंबई : शिवभोजन आणि आनंदाचा शिधा यांची १ लाख कोटींची बिले थकलेली आहेत. आनंदाचा शिधामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. लाडक्या बहिणींना आता निकष लावले जात आहेत. मुंबईची लूट करायची आणि कंत्राटदारांवर उधळपट्टी करायची, असे सरकारचे काम सुरू आहे, अशी टीका उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.

रस्ते दोन वर्षांत खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता फक्त २६ टक्के कामे झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, केवळ ५ टक्केच कामे झाली आहेत. महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीला निधीचे कारण पुढे करून ब्रेक लावला, अशी टीका ठाकरे यांनी केली. 

टॅग्स :आदित्य ठाकरेमुंबई महानगरपालिकाभाजपाराजकारण