राजकीय ‘किटी पार्टी’त कुणाला बोलावणार?; अमृता फडणवीस म्हणाल्या, मी तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 07:54 AM2023-01-08T07:54:29+5:302023-01-08T07:54:42+5:30

गाण्याच्या लॉन्चिंग सोहळ्यात अमृता फडणवीस यांच्याशी ‘लोकमत डॉट कॉम’ने केलेल्या खास गप्पांमध्ये त्यांनी गाण्याबद्दल माहिती तर दिलीच पण इतरही विषयांवर दिलखुलासपणे संवाद साधला.

Lokmat interviewed Amruta Fadnavis at the launch of the song | राजकीय ‘किटी पार्टी’त कुणाला बोलावणार?; अमृता फडणवीस म्हणाल्या, मी तर...

राजकीय ‘किटी पार्टी’त कुणाला बोलावणार?; अमृता फडणवीस म्हणाल्या, मी तर...

googlenewsNext

दीपाली म्हात्रे / हरिता पुराणिक

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आता बँकिंग क्षेत्रापुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत. त्यांनी आता गायनातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी गाण्याचा छंद जोपासत प्रेक्षकांसाठी अनेक गाणी आणली. त्या आता ‘मूड बना लेया वे’, हे पंजाबी गाणं घेऊन आल्या आहेत. नुकतंच त्यांचं हे गाणं प्रदर्शित झालं आणि याही गाण्याला चांगली पसंती मिळत आहे. गाण्याच्या लॉन्चिंग सोहळ्यात अमृता फडणवीस यांच्याशी ‘लोकमत डॉट कॉम’ने केलेल्या खास गप्पांमध्ये त्यांनी गाण्याबद्दल माहिती तर दिलीच पण इतरही विषयांवर दिलखुलासपणे संवाद साधला.

राजकारणाशी निगडित महिलांची ‘किटी पार्टी’ जर तुम्ही आयोजित केली तर कुणाकुणाला बोलावणार?, असं विचारल्यावर त्यांनी सर्वपक्षीय महिला नेत्यांना प्राधान्य देऊ, असे मनमोकळेपणाने सांगितले. ‘स्त्रियांचा गेट टूगेदर जर मी आयोजित केला तर मी भाजपच्या महिला नेत्यांना तर बोलवेनच पण राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच सर्वच पक्षांच्या महिलांना बोलावेल. कारण महिला शक्ती एकत्र आली तर सर्व मिळून महिलांच्या समस्यांबाबत काम करू शकू’, असे त्यांनी सांगितले.

देवेंद्रजी काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांना माझी गाणी आवडतात. त्यांनी हे गाणं पाहिलं आणि तुझा यात एक वेगळा पैलू आहे, अशी दाद दिली. देवेंद्र फडणवीस यांना गाण्यात खूप रस आहे. ‘चुरा लिया’, हे गाणं आमच्या दोघांचं आवडीचं गाणं आहे. त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते गाणी ऐकत असतात, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

सिनेमात येणार का?

सिनेमात येण्याचे माझे काहीच प्लॅनिंग नाही. मी जे गाते, त्यात माझे इमोशन असतात, त्याप्रमाणे मी अभिनय करते आणि त्यातच मला समाधान आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Lokmat interviewed Amruta Fadnavis at the launch of the song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.