Join us  

'भाजपाचे पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सचे राजकारण तर विरोधकांचे भयगंडाचे राजकारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 7:17 PM

भाजपाचे पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सचे राजकारण आणि विरोधी पक्षांचे भयगंडाचे राजकारण असा या निवडणुकीतील सामना आहे असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय सहस्त्रबुध्दे यांनी केला.

मुंबई -  पूर्ण बहुमताने सत्तेवर आलेले आणि पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे भाजपाचे सरकार हे पहिलेच काँग्रेसेतर सरकार आहे. या सरकारने गेल्या पाच वर्षांत उत्तरदायित्व, पारदर्शिता, कल्पकता आणि जनसहभाग यांच्या आधारे उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भाजपाचे पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सचे राजकारण आणि विरोधी पक्षांचे भयगंडाचे राजकारण असा या निवडणुकीतील सामना आहे असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय सहस्त्रबुध्दे यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना विनय सहस्त्रबुध्दे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या आघाडी सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत विशेष कामगिरी केली असून या निवडणुकीत भाजपा आपल्या कामगिरीच्या आधारे जनादेश मागेल. देशाच्या राजकीय इतिहासात प्रथमच सत्ताधारी पक्षाकडून भावनिक मुद्द्यांच्या ऐवजी कामाच्या आधारे जनतेला मते मागण्यात येत असून ही हिंमत भाजपामध्येच आहे

हा नवा भारत आहे. अरे ला कारे करणारा भारत आहे, हे देशाने तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक करून दाखवून दिले. ‘पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स’च्या आधारे भाजपा जनादेश मागत आहे. दुर्दैवाने यापूर्वी अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने तसे केलेले नाही. किमान वेतनाची काँग्रेसची घोषणा हा भूलभुलैय्या आहे. मतदारांवर त्याचा परिणाम होणार नाही. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते पण त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने तेथे असंतोष आहे काँग्रेसची विश्वासार्हता रसातळाला गेली असल्याचा आरोप त्यांनी केला. 

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ मार्च रोजी देशभरातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. अस्वच्छता, भ्रष्टाचार, गरिबी आणि दहशतवाद याच्या विरोधात लढण्यासाठी नागरिक चौकीदार म्हणून या संवाद कार्यक्रमात सहभागी होतील अशी माहिती विनय सहस्त्रबुध्दे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९भाजपाकाँग्रेसमध्य प्रदेशराजकारणनरेंद्र मोदी