Join us

वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर! पालघर, मुंबई, रायगडमधील उमेदवारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 21:20 IST

Lok Sabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. मुंबई, पालघर, रायगड मधील उमेदवारांची घोषणा केली.

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम,मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. 

मुंबई उत्तरमधून बीना रामकुमार सिंग यांना तर मुंबई उत्तर पश्चिममधून संजीव कुमार आप्पाराव कलकोरी, मुंबई दक्षिण मध्यमधून अब्दुल हसन खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

रायगड-कुमुदानी रविंद्र चव्हाणउस्मानाबाद-भाऊसाहेब रावसाहेब आंधळकरनंदूरबार-हनुमंत कुमार मनराम सूर्यवंशीजळगाव-प्रफुल कुमार रायचंद लोढादिंडोरी-गुलाब मोहन बरडेपालघर-विजया म्हात्रेभिवंडी-निलेश सांबरे

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी चर्चा सुरू होती.  पण, जागावाटपावरुन चर्चा होऊ झाल्या नाहीत. दरम्यान, आता वंचित बहुजन आघाडी राज्यात स्वतंत्र लढणार आहे. 

टॅग्स :वंचित बहुजन आघाडीलोकसभा निवडणूक २०२४