Join us  

Lok Sabha Election 2024: मुंबईत मोठी राजकीय घडामोड होणार? ठाकरे गटाला झटका; महायुती टक्कर देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 10:27 PM

देशात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्व पक्षांची उमेदवारी जाहीर होऊन आता जाहीर सभांचा धडाका सुरू झाला आहे.

देशात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्व पक्षांची उमेदवारी जाहीर होऊन आता जाहीर सभांचा धडाका सुरू झाला आहे. या लोकसभा निवडणुकीत मोठे बदल झाल्याचे दिसत आहे.या निवडणुकीत शिवसेनेत दोन गट तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत. याचा मोठा परिणाम होणार असल्याचं दिसत आहे. दरम्यान, ऐन प्रचारांच्या धडाक्यात आता  एबीपी-सीव्होटरचा राज्यातील फायनल ओपीनीअन पोल समोर आला आहे. या पोलमध्ये मुंबईत मोठे बदल झाल्याचे समोर आले आहे. 

मुंबईतील लोकसभा मतदारसंघातील समीकरण बदलली आहेत. काही जागांवर महायुतीने तर काही जागांवर महाविकास आघाडीने अजूनही उमेदवारांची घोषणा केलेली नाही. 

महाराष्ट्रात दोन महिन्यांत बाजी पालटली? 48 पैकी 18 जागा...; फायनल ओपिनिअन पोल आला

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ

मुंबईतील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा महत्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात महायुतीने पियुष गोयल यांना मैदानात उतरवले आहे. तर महाविकास आघाडीने त्यांच्याविरोधात अजूनही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. महाविकास आघाडीत या मतदारसंघावरुन अजूनही चर्चा सुरू आहेत. या पोलमध्ये भाजपाच्या पियुष गोयल याना सोपा विजय असल्याचं दाखवण्यात आलं आहे. 

उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ

 उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ हा महत्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांनी उमेदवारी दिली आहे. तर महायुतीने अजूनही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. या मतदारसंघातील खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात आहेत. या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला विजय सोपा असल्याचं पोलमध्ये दाखवलं आहे. 

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात भाजपाने आपला उमेदवार बदलला आहे. महायुतीने मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या संजय दीना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात काट्याची टक्कर दिसत असून यात भाजपाचे मिहीर कोटेचा आघाडीवर असल्याचं पोलमध्ये दिसत आहे. 

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीनेही उमेदवार जाहीर केलेला नाही. या मतदारसंघात भाजपाच्या पुनम महाजन खासदार आहेत. पण, अजूनही भाजपाने उमेदवारी जाहीर केलेली नाही. या मतदारसंघात आताच्या निवडणुकीत महायुतीसाठी ही जागा सोपी असल्याचं पोलमध्ये सांगितलं आहे. 

मुंबई मक्षिण मध्ये लोकसभा मतदारसंघ

मुंबई मक्षिण मध्ये लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीने शिंदे गटाने राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात महायुतीच्या राहुल शेवाळे यांच्यासाठी विजय सोपा असल्याचे पोलमध्ये दाखवलं आहे. 

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

 दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीने अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही. या मतदारसंघात काट्यावर लढत होणार आहे. या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार आघाडीवर असल्याच पोलमध्ये म्हटले आहे.   

टॅग्स :मुंबईशिवसेनाभाजपाउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणुक रणांगण २०२४