Join us  

Lockdown:...अन् मनसेच्या शाखेत ‘शुभमंगल’ पार पडलं; शेवटच्या क्षणी भोसले-परब लग्न सोहळ्याबाबत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 4:03 PM

प्रसाद सावंत भोसले आणि अस्मिता परब यांचा विवाह सोहळा २८ एप्रिल रोजी भांडुपच्या सह्याद्री विद्या मंदिर इथं पार पडणार होता.

ठळक मुद्देमुंबईत सावंत-भोसले आणि परब यांच्या लग्नसोहळ्यावेळी एक असा किस्सा घडलालग्न समारंभ २५ लोकांच्या उपस्थितीत दोन तासांत उरकावावा लागणार आहे. निर्बंधांचा भंग करणाऱ्या कुटुंबांना ५० हजार रुपये दंड आणि संबंधित हॉल किंवा समारंभस्थळ आपत्ती आहे तोवर सील केले जाणार आहे.

मुंबई – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी १५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या लॉकडाऊन काळात अनेक गोष्टींवर निर्बंध आले. त्यात लग्न समारंभात २५ पेक्षा जास्त माणसांना सहभागी होण्यास बंदी घातली आहे. कोणत्याही हॉलने नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर सरकारकडून कारवाई होण्याची भीती आहे. म्हणून अनेक जण ऐनवेळी लग्न समारेभासाठी घेतलेले बुकींग नाकारत आहेत.

मुंबईत सावंत-भोसले आणि परब यांच्या लग्नसोहळ्यावेळी एक असा किस्सा घडला. प्रसाद सावंत भोसले आणि अस्मिता परब यांचा विवाह सोहळा २८ एप्रिल रोजी भांडुपच्या सह्याद्री विद्या मंदिर इथं पार पडणार होता. या बाबत दोन्ही कुटुंबाकडून पत्रिका छापून निमंत्रण देण्यात आली. पण ऐनवेळी शासनाच्या नियमांवर बोट ठेऊन शेवटच्या घटकेत कुटुंबीयांना ठरलेल्या तारखेला हॉल मिळणं शक्य नाही असं विद्यालयाकडून अचानक कळवण्यात आले. त्यामुळे आता पुढे काय करायचं असा प्रश्न दोन्ही कुटुंबीयांना पडला होता. अशावेळी कुटुंबीयांनी स्थानिक मनसेचे शाखाध्यक्ष सुनील नारकर यांच्याकडे धाव घेतली.

नेहमी खळ्यखट्याक स्टाईलनं उत्तर देणारी मनसे यावेळी मात्र परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता एका वेगळ्याच अंदाजाच या कुटुंबाच्या मदतीला धावली. आणि कधी नव्हे ते पहिल्यांदा मनसेच्या राजगड शाखेत शासकीय नियमानुसार २५ माणसांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याबाबत मनसेचे सचिव सचिन मोरे म्हणाले की, शेवटच्या क्षणी वधुवरांच्या कुटुंबीयांच्या मदतीला मनसे धावली. लग्न सोहळा पार पडला त्यामुळे जनमानसात मनसेबाबत असणारी आपुलकी आणखी वाढेल यात शंका नाही. राज ठाकरेंनी स्थापन केलेली ही संघटना पक्ष न राहता एक कुटुंब होत चालली आहे. या लग्न प्रसंगात शाखाध्यक्ष सुनील नारकर यांनी कुटुंबाची जी मदत केली त्याचं कौतुक आहे असं ते म्हणाले.

लग्नसमारंभाबाबतकाय आहेत सरकारचे नियम?

ब्रेक दन चैन अंतर्गत सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधामध्ये लग्न समारंभ २५ लोकांच्या उपस्थितीत दोन तासांत उरकावावा लागणार आहे. या निर्बंधांचा भंग करणाऱ्या कुटुंबांना ५० हजार रुपये दंड आणि संबंधित हॉल किंवा समारंभस्थळ आपत्ती आहे तोवर सील केले जाणार आहे.

टॅग्स :मनसेलग्नराज ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस