Join us  

Lockdown: शासकीय कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एकदा कार्यालयात हजर राहणं बंधनकारक अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 2:32 PM

काही कर्मचारी लॉकडाऊन दरम्यान पूर्व परवानगीशिवाय गैरहजर राहत आहे तसेच अनेक जण गावी गेल्याचं दिसून आलं.

ठळक मुद्देप्रत्येक विभागाने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे रोस्टर तयार करावेविनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे उपस्थित कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण८ जूनपासून आठवड्यातून एकदा कार्यालयात उपस्थित राहणं बंधनकारक

मुंबई – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसचा भारतातही फटका बसला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांच्या वर पोहचली आहे. यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहे. कोविड १९ चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन सुरु करण्यात आलं. गेल्या २ महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवसाय ठप्प पडले, तसेच शासकीय कार्यालयही ओस पडले.

राज्य शासनाकडून रेड झोनमध्ये असणाऱ्या कार्यालयात ५ टक्के उपस्थिती बंधनकारक केली असताना काही कर्मचारी लॉकडाऊन दरम्यान पूर्व परवानगीशिवाय गैरहजर राहत आहे तसेच अनेक जण गावी गेल्याचं दिसून आलं. त्यामुळे उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. यामुळे कार्यालयीन कामाचे कर्मचारी निहाय समन्यायी वाटप होणे गरजेचे असल्याने शासनाने याबाबत परिपत्रक काढले आहे.

यानुसार प्रत्येक विभागाने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे रोस्टर तयार करावे, ज्यामध्ये प्रत्येकाला आठवडण्यातून किमान एक दिवस कार्यालयात हजर राहावे लागेल. वैद्यकीय कारणास्तव रजेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वगळता सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन काळात विनापरवानगी मुख्यालय सोडले आहे त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची सूचना सरकारने दिली आहे.

त्याचसोबत आठवड्यातून एकापेक्षा जास्त दिवस कर्मचारी हजर राहिला असेल ते वगळून त्या आठवड्यातील अन्य दिवसांची अनुपस्थिती देय विनावेतन रजा म्हणून नियमित करण्यात येणार आहे. हा आदेश ८ जून पासून अंमलात येणार आहे. राज्य सरकारचे सर्व शासकीय कार्यालये, महामंडळे, आस्थापना यांना हा आदेश लागू राहणार आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

...अन् ७ वर्षाच्या मुलीने थेट पोलीस ठाणे गाठलं; घडलेला प्रकार ऐकून पोलीसही हादरले

शेतात काम करताना जमिनीत नांगर अडकला; शेतकऱ्याला सोने-रत्नांचा मोठा खजिना सापडला

बाबो! नवरी नटली अन् गावभर चर्चा झाली; एक दोन नव्हे तर तब्बल १०० किलोचा घागरा

हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी फॉर्म भरावा लागणार; Entry आणि Exit पर्यंत ‘या’ ७ गोष्टी विसरु नका!

आश्चर्य! जगात केवळ एकच व्यक्ती खरेदी करु शकणार ‘ही’ ढासू बाईक; काय आहे स्पेशल?

टॅग्स :राज्य सरकारकर्मचारीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस