'लॉकडाऊन हे पॉझ बटण, कोरोनासोबत जगताना SMS पद्धतीचा अवलंब करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 09:40 AM2020-09-06T09:40:57+5:302020-09-06T09:41:46+5:30

संक्रमणाची गती ब्रेक करण्यासाठी आणि लॉकडाऊन कालावधीत आपल्याला पुढील वैद्यकीय इन्फास्ट्रक्चरचा आढावा घेता येतो. अडचणींना तोंड देणे, व तयारी करण्यासाठी हा लॉकडाऊन महत्त्वाचा असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं

'Lockdown pause button, adopt SMS mode while living with Corona', rajesh tope | 'लॉकडाऊन हे पॉझ बटण, कोरोनासोबत जगताना SMS पद्धतीचा अवलंब करा'

'लॉकडाऊन हे पॉझ बटण, कोरोनासोबत जगताना SMS पद्धतीचा अवलंब करा'

Next
ठळक मुद्देSMS म्हणजे नेमकं काय विचारलं असता, एस म्हणजे सोशल डिस्टन्स, एम म्हणजे मास्क आणि एस म्हणजे सॅनिटायझेशन या बाबींचा अवलंबन आपल्याला जगण्यात करावा लागणार आहे, असे टोपे यांनी सांगितलं.

मुंबई - देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि अनलॉक तसेच राज्यातील वाढता आकडा व मिशन बिगेन अगेनच्यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. कोरोनासोबत जगावं लागेल, मग काही ठिकाणी गर्दी टाळणे अशक्य असते, त्याठिकाण कसं जगायचं? असा प्रश्न आरोग्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना कोरोनावरील लस येईपर्यंत आपल्याला काही बंधन घालावीच लागणार आहेत. लॉकडाऊन हे पॉझ बटण होतं, त्यामुळे कोरोनासोबत लढण्याची तयारी आपल्याला करता आल्याचे राजेश टोपेंनी म्हटले.  

संक्रमणाची गती ब्रेक करण्यासाठी आणि लॉकडाऊन कालावधीत आपल्याला पुढील वैद्यकीय इन्फास्ट्रक्चरचा आढावा घेता येतो. अडचणींना तोंड देणे, व तयारी करण्यासाठी हा लॉकडाऊन महत्त्वाचा असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच, लॉकडाऊन हे पॉझ बटण असून आता अनलॉकच होणार आहे. शाळा, वाहतूक, मॉल्स आणि धार्मिक स्थळे अद्यापही प्रतिबंधित किंवा काही बंधने घालून सुरू आहे. मात्र, हे हळू हळू सर्वकाही पूर्वीप्रमाणे सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी, आता एसएमएस पद्धतीचा अवलंब आपणाला करावा लागणार आहे. 

SMS म्हणजे नेमकं काय विचारलं असता, एस म्हणजे सोशल डिस्टन्स, एम म्हणजे मास्क आणि एस म्हणजे सॅनिटायझेशन या बाबींचा अवलंबन आपल्याला जगण्यात करावा लागणार आहे, असे टोपे यांनी सांगितलं. प्रत्येकाने आपली नोकरी करावी, व्यवसाय करावा पण एसएमएस पद्धतीचा वापर करावा, कुणालाही काही होणार नाही. फक्त को मॉर्मिड व सिनियर सिटीझन्सने अधिक काळजी घ्यावी, असा सल्लाही आरोग्यमंत्र्यांनी दिलाय. नागरिकांना स्वत:हून स्वत:ला शिस्त लावायला हवी. गरज असेल तरच सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जावे. काय करावे, काय नाही करावे हे आपण ठरवायला हवे. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक... असल्याचंही राजेश टोपेंनी म्हटले आहे.

एकाच दिवसात 20,489 रुग्ण

ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात नियंत्रणात आलेल्या राज्यातील कोरोना प्रादुर्भावाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. १ ते ५ सप्टेंबर या कालावधीत राज्यात तब्बल ९१ हजार १० रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात शनिवारी पुन्हा एकदा २० हजार ४८९ रुग्ण निदानाची नोंद झाली असून, ही आतापर्यतची सर्वाधिक वाढ आहे. तर दिवसभरात ३१२ मृत्यू झाले असून, एकूण बळींची संख्या २७ हजार २७६ झाली आहे. सध्या २ लाख २० हजार ६६१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०१ टक्के झाले असून, मृत्युदर २.९७ टक्के आहे. त्याखालोखाल ठाण्यात २३ हजार तर मुंबईत २२ हजार सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत दिवसभरात १ हजार ७३७ रुग्ण आढळले असून, ३३ मृत्यू झाले आहेत.   
 

Web Title: 'Lockdown pause button, adopt SMS mode while living with Corona', rajesh tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.