Join us  

राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन; कोणकोणते होणार बदल; काय सुरु राहणार, काय बंद?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 7:53 PM

राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.

मुंबई: राज्यातील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत देण्यात आलेल्या सवलती, नियमांमधील शिथीलता कायम राहील, असंही या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार १३३ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार २७२ झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनेतला आवाहन केलंय की, अद्याप काळजी घेणे गरजेचं आहे. कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही. सध्या आपण कात्रीत सापडलो असून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण मिशन बिगेन अगेन सुरु करतोय. मात्र, लॉकडाउन सुरुच राहणार आहे. त्यानंतर, सरकारने 31 जुलैपर्यंत राज्यातील लॉकडाऊन वाढवला आहे. 

राज्यात १ ते ३१ जुलैपर्यंत मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा असेल. या टप्प्यात मुंबई, ठाणे, पुणे व अन्य महानगरपालिकांच्या हद्दीत आणि अन्य भागांत नेमके कोणते नियम असतील. कोणत्या गोष्टी सुरू राहणार, काय काय बंद राहणार हे जाणून घ्या.

पुढील नियम कायम राहणार- 

  • सार्वजनिक ठिकाणी वावरताना दोन व्यक्तींमध्ये सहा फूट अंतर राखणे बंधनकारक असणार आहे.
  • घराबाहेर पडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवास करताना चेहऱ्यावर मास्क घालणे बंधनकारक असणार आहे.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणारसोशल डिस्टन्सिंगच्या नियमांसह लग्न समारंभाला परवानगी आहे. ५० पेक्षा जास्त माणसे उपस्थित असू नयेत.
  • अंत्यविधीवेळी सुद्धा ५० पेक्षा जास्त लोकांना परवानगी नसेल.

लॉकडाऊनमध्ये पुढील गोष्टींना सशर्त परवानगी असणार आहे-

  • अत्यावश्यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणे सुरु राहणार
  • रेस्टॉरंट/किचन होम डिलिव्हरी करण्यास परवानगी
  • सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी
  • वर्तमानपत्राची छपाई आणि वितरणास परवानगी
  • इतर दुकानेही संबंधित महापालिकांच्या सूचनेनुसार उघडतील.
  •  टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी केवळ आवश्यक प्रवासासाठी उपलब्ध असेल. त्यात चालक + दोन जणच प्रवास करू शकतात. दुचाकीवर केवळ चालकाला परवानगी.
  • ऑनलाइन/दूरशिक्षण याला मान्यता असेल.
  • सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थिती असावी. (आपत्कालीन, आरोग्य आणि वैद्यकीय, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, अन्न आणि नागरी पुरवठा वगळता)
  • केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर यांना नियम पाळून कार्यरत राहण्याची मुभा.

कार्यालयासाठी अतिरिक्त सूचना-

  • शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे.
  • दोन कर्मचाऱ्यांमध्ये पुरेसे अंतर राहील, दोन शिफ्ट आणि लंच ब्रेकमध्ये गर्दी होणार नाही याची जबाबदारी व्यवस्थापनाची असणार आहे.
  • कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग, हँड वॉश, सॅनिटायझरची व्यवस्था बंधनकारक.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्रउद्धव ठाकरे