Join us

रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक हार्बर मार्गावरील लोकल रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 18:43 IST

मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार ते ठाणे दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

 

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार ते ठाणे दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सीएसएमटी येथून सकाळी ९.४५ ते दुपारी २.३० दरम्यान कल्याण दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील विशेष सेवा माटुंगा ते दिवा दरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. दिवा येथून सकाळी ९.५८ ते दुपारी ३.१८ दरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद विशेष सेवा दिवा आणि माटुंगा दरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. हार्बर लाइन सकाळी ११.२५ ते संध्याकाळी ४.२५ पर्यंत सीएसएमटीहून चुनाभट्टीकडे जाणाऱ्या लोकल रद्द केल्या आहेत. सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत चुनाभट्टीहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल रद्द केल्या आहेत. सकाळी ११.१५ ते संध्याकाळी ४.०० पर्यंत सीएसएमटीहून पनवेलला जाणा-या लोकल रद्द केल्या आहेत. सकाळी ९. ४५ ते दुपारी २.४१ पर्यंत पनवेलहून सीएसएमटी दिशेकडे जाणा-या लोकल रद्द केल्या आहेत. ब्लॉक कालावधीत विशेष लोकल पनवेल – कुर्ला- पनवेल या दरम्यान धावतील.

टॅग्स :रेल्वेमुंबईलॉकडाऊन अनलॉक