Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज ९० लाखांचे, वसुली सव्वा कोटींची, तरीही वृद्धेचा छळ; आरसीएफ पोलिसांनी नोंदविला फसवणुकीचा गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 15:51 IST

वाशी नाका परिसरात राहणाऱ्या पूनमचंद खेमराज शर्मा (६०) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

मुंबई : वाशी नाका परिसरात राहणाऱ्या वृद्धेला ९० लाख रुपये १ टक्के व्याज दराने देऊन त्यांच्याकडून सव्वाकोटींची वसुली केली. पुढे आणखीन २ टक्के दराने रक्कमेची मागणी करत धमकावल्याने महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार आरसीएफ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. 

वाशी नाका परिसरात राहणाऱ्या पूनमचंद खेमराज शर्मा (६०) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मार्च २०२० मध्ये अश्विन जैन याने तक्रारदार यांना ९० लाख रुपये १ टक्के व्याज दराने देऊन, ती रक्कम परत करेपर्यंत फिर्यादींना विश्वासाने मालकीच्या दुकानाचे त्याच्या नावे खरेदी खत तयार केले. 

दुकानाची तिसऱ्या व्यक्तीला विक्री- दुकानाचे मूळ कागदपत्रे व खरेदी खत त्याच्याकडे ठेवून १ टक्केऐवजी दोन टक्के दराने रक्कम परत करण्यासाठी तगादा लावला. - धमकावून ९० लाखांचे १ कोटी ११ लाख ५५ हजारांचे सोने व १७ लाख ३० हजार रुपयांची रोकड असे एकूण १ कोटी २८ लाख ८५ हजार घेऊन फसवणूक केली. - तक्रारदार यांच्या दुकानाची परस्पर तिसऱ्या व्यक्तीला विक्री केल्याने महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :गुन्हेगारीधोकेबाजीपोलिस