आंदोलनातून खोत, पडळकर यांना मुक्त केले : सदावर्ते
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 12:36 IST2021-11-26T12:35:16+5:302021-11-26T12:36:06+5:30
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संपातून माघार घेतल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची एसटी संपाविषयीची भूमिका स्पष्ट केली.

आंदोलनातून खोत, पडळकर यांना मुक्त केले : सदावर्ते
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपातून माघार घेत असल्याची घोषणा भाजप नेत्यांनी केली आहे. त्यावर टीका करत खोत, पडळकर यांना आंदोलनातून मुक्त केले असून कर्मचारी आंदोलन चालूच ठेवतील, असे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संपातून माघार घेतल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची एसटी संपाविषयीची भूमिका स्पष्ट केली, तर संघटनेतील कामगारांचे पैसे गोळा केले, त्यातून ३ कोटी रुपये जमा केल्याच्या आरोपांवरून सदावर्ते यांनी आमदार पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार प्रहार केला. मी एक रुपयाही कोणाकडून घेतला नाही. हे पराभूत मानसिकतेतून काहीही बोलले जात आहे, असे ते म्हणाले.