Let's decide based on what we get in the post: Khadse | पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ : खडसे

पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ : खडसे

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे हे महिनाभरात पक्ष सोडणार असून दुसऱ्या पक्षात काय पद मिळते, केवळ याची प्रतीक्षा आहे, असा संवाद असणारी आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

खडसे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीतही स्थान न दिल्यामुळे त्यांची नाराजी अधिकच वाढली आहे. त्यात त्यांना काही कार्यकर्ते फोन करून योग्य निर्णय घ्या, अशी मागणी करीत आहे. अशाच प्रकारे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रोशन भंगाळे या कार्यकर्त्याने खडसेंशी संपर्क साधून पक्ष सोडण्याविषयी चर्चा केली. ही आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर हा तरुण नॉट रिचेबल
झाला आहे.

खडसे यांचा इन्कार
या क्लिपविषयी खडसे यांनी सांगितले की, कार्यकर्ते अशा प्रकारची विचारणा करीतच असतात. तो कॉल चुकीचा असून ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

क्लिपमधील संवाद
व्हायरल झालेल्या या क्लिपच्या संवादानुसार सदर कार्यकर्त्याने खडसे यांच्याशी संवाद साधला आहे.
रविंद्र भंगाळे : भाऊ आता राष्ट्रीय कार्यकारीणीतही डावलण्यात आल्याने पक्ष सोडा व योग्य निर्णय घ्या.
खडसे : हो निर्णय घ्यायचा आहे. दुसरीकडे काय पद मिळते, ते तर बघू दे. दुसरीकडे जाऊन का नुसतेच बसायचे, काही तरी पद मिळाले पाहिजे की नाही, असे सांगत महिनाभरात निर्णय घेऊ.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Let's decide based on what we get in the post: Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.