लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमृताते पैजा जिंकणारी अशी मराठी आहे. तिची चिंता करण्याची गरज नाही. मी मराठी आहे हे अभिमानाने आणि स्वाभिमानाने म्हणा. ‘हमे मराठी नाही आती’, असा आवाज आल्यावर ते बोलणाऱ्यांच्या कानाखाली मराठीचा आवाज निघाला पाहिजे, असे उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने आयोजित मराठी भाषा दिन सोहळ्यात बजावले.
बिर्ला मातोश्री सभागृह येथे आयोजित कार्यक्रमाला उद्धवसेनेचे नेते माजी खा. विनायक राऊत, खा. अरविंद सावंत, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष खा. अनिल देसाई आदी नेते उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा निवडणुकीच्या तोंडावर केली. आता आपण आपल्या जगण्यातून मराठी आहोत हे जाणवून दिले पाहिजे. मराठीचा अभिमान जपताना इतर भाषेचा दुस्वास करा असा अर्थ नाही. मराठीचा अभिमान वाटावा असे वागले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. मराठीतून शिक्षण सक्तीचे केले पण भाषेच्या मुद्द्यावर अजूनही आपली एकजूट दिसत नाही. दुकानावर मराठी पाट्या लावण्याची सक्ती करणारा कायदा आम्ही आणला होता, असे ते म्हणाले.
गंगेत डुबक्या मारून पाप धुतले जाणार नाहीपूर्वी नमस्कार करताना रामराम करायचो, त्याचे श्रीराम कधीपासून म्हणायला लागलो, याचा विचारही करण्याची गरज आहे. महाराष्ट्राशी गद्दारी करून काही जणांनी गंगेत डुबक्या मारल्या. त्यांनी कितीही डुबक्या मारल्या तरी त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. त्यांनी जे पाप केले आहे ते धुतले जाणार नाही, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.