Legendary Music composer Mohammed Zahur Khayyam passes away | बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे निधन
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे निधन

मुंबई  :  बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 92व्या वर्षी सोमवारी निधन झाले. 1953 ते 1990 या कालावधीत त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. दीर्घकाळापासून ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. याचदरम्यान प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने जुहूच्या सुजॉय रूग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली. 

1947 मध्ये फिल्मी करिअर सुरु करणाऱ्या खय्याम यांनी अनेक गाण्यांना संगीत दिले. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती 1958 साली प्रदर्शित झालेल्या ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटाने. खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली या चित्रपटाची गाणी कमालीची लोकप्रिय झाली होती. कभी कभी, उमराव जान, फिर सुबह होगी अशा सुपरडुपर हिट चित्रपटांना त्यांना संगीत दिले. कभी कभी व उमराव जान या दोन चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  

आपल्या 90 व्या वाढदिवसाला खय्याम यांनी सुमारे 12 कोटींची रक्कम ‘खय्याम प्रदीप जगजीत ट्रस्ट’ला दान केली होती.बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम हे दीर्घकाळापासून ते फुफ्फुसाच्या आजाराने आजारी होते. याचदरम्यान प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने जुहूच्या सुजॉय रूग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली. 

1947 मध्ये फिल्मी करिअर सुरु करणाºया खय्याम यांनी अनेक गाण्यांना संगीत दिले. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती 1958 साली प्रदर्शित झालेल्या ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटाने. खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली या चित्रपटाची गाणी कमालीची लोकप्रिय झाली होती. कभी कभी, उमराव जान, फिर सुबह होगी अशा सुपरडुपर हिट चित्रपटांना त्यांना संगीत दिले. कभी कभी व उमराव जान या दोन चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  

श्रद्धांजली...

सर्वश्रेष्ठ संगीत साधक
ख्यातकीर्त संगीतकार आदरणीय खय्याम साहेबांच्या निधनाने भारतीय संगीताला वैविध्यपूर्ण अंगाने समृद्ध करणारा प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. गजल, शास्त्रीय संगीतासोबतच चित्रपट गीतांनी आपणा साऱ्यांनाच या श्रेष्ठ कलावंताने तृप्त केले. कभी कभी, उमराव जान, रजिया सुलतान, थोडीसी बेवफाई, त्रिशूल, नुरी या सारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी अविस्मरणीय गाणी दिली. खय्याम साहेबांची गाणी नदीच्या प्रवाहासारखी संथ आणि प्रवाहित आहेत. त्यांच्या गाण्यात कानठळ्या बसविणाºया गोंगाटाला स्थान नव्हते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी संगीत सेवा दिली. या क्षेत्रातील नवोदित आणि उपेक्षित कलावंतांच्या मदतीसाठी त्यांनी आपली आयुष्यभराची कमाई दान करीत एक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केले. आपण या जगातून निघून गेल्यानंतरही ही संगीत साधना अखंड सुरू राहावी यासाठी अखेरपर्यंत तळमळणाºया या सर्वश्रेष्ठ संगीत साधकाला भावपूर्ण श्रद्धांजली. - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

भावस्पर्शी संगीत देणारा कलावंत गमावला
ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांच्या निधनाने अतिशय तरल आणि भावस्पर्शी संगीत देणारा महान कलावंत आपण गमावला आहे. खय्याम यांच्या अभिजात रचनांनी रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. अनेक चिरंतन अजरामर ठरणाºया रचनांमुळे खय्याम रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील. अलिकडेच हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमात त्यांची भेट झाली होती. त्यावेळी त्यांचे प्रशंसापर आशीर्वाद लाभले होते. ही भेट अखेरची ठरल्याचे मला मनस्वी दु:ख आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

संगीताच्या एका युगाचा अंत
खय्याम साहेब महान संगीतकार व अत्यंत चांगले व्यक्ती होते. त्यांच्या निधनाने संगीताच्या एका युगाचा अंत झाला आहे. ते मला लहान बहिणीप्रमाणे वागणूक देत व माझ्यासाठी खास आवडीची गाणी तयार करीत असत. त्यांच्यासोबत काम करणे अत्यंत आनंदाचे होते. ते परफेक्शनिस्ट असल्याने त्यांच्यासोबत काम करताना थोडीशी भीतीदेखील वाटत असे. त्यांची शायरीची समज अत्यंत उच्च दर्जाची होती.  - लता मंगेशकर


Web Title: Legendary Music composer Mohammed Zahur Khayyam passes away
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.