१६० फुटांची खोली सोडा; आता मिळणार ५०० फुटांचे मोफत घर; ८६४ पात्र रहिवाशांना उद्या सदनिकांचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:48 IST2026-03-15T13:47:23+5:302026-03-15T13:48:17+5:30

दोन ते तीन पिढ्यांपासून १६० चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना म्हाडामार्फत ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची २ बीएचके स्वरूपातील सदनिका मालकी तत्त्वावर मोफत दिली जाईल.

Leave 160 feet room; now you will get 500 feet free house; 864 eligible residents to be distributed flats tomorrow | १६० फुटांची खोली सोडा; आता मिळणार ५०० फुटांचे मोफत घर; ८६४ पात्र रहिवाशांना उद्या सदनिकांचे वितरण

१६० फुटांची खोली सोडा; आता मिळणार ५०० फुटांचे मोफत घर; ८६४ पात्र रहिवाशांना उद्या सदनिकांचे वितरण


मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगावमधील प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या ५ इमारतींतील एकूण ८६४ पात्र रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांचे वितरण सोमवारी केले जाईल. यामध्ये ४२३ सदनिका पोलिस विभागातील निवृत्त पोलिस, वारस व कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांकरिता आहेत. दोन ते तीन पिढ्यांपासून १६० चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना म्हाडामार्फत ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची २ बीएचके स्वरूपातील सदनिका मालकी तत्त्वावर मोफत दिली जाईल.

नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता कार्यक्रम होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे,  विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आदी उपस्थित राहणार आहेत.

म्हाडातर्फे नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात दोन पुनर्वसन इमारतीत एकूण २० टॉवर बांधण्यात येणार आहेत. यात पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत पुनर्वसन इमारत क्रमांक १ मधील एकूण ८ टॉवर्सपैकी ५ टॉवर्समधील ८६४ सदनिका दिल्या जातील. पुनर्विकास प्रकल्पाच्या ६.४५ हेक्टर जागेवर तळ अधिक ३ मजल्यांच्या ४२ चाळींमध्ये ३,३४४ भाडेकरू  वास्तव्यास आहेत. दोन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात २३ मजल्यांच्या २० पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत. 

पहिल्या टप्प्यामध्ये नायगाव बीडीडी चाळीतील प्लॉट ‘ब’मधील  १४०१ रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यामध्ये ८ पैकी ५  पुनर्वसन इमारतींतील ८६४ सदनिकांच्या चाव्या प्रदान केल्या जातील.  उर्वरित ५३७ सदनिकांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, एप्रिलमध्ये हे काम पूर्ण 
होणार आहे.

६५ टक्के जागेचा वापर पुनर्वसनासाठी हा प्रकल्प राबविताना एकूण 
भूखंडापैकी ६५ टक्के जागेचा वापर पुनर्वसनासाठी करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्लॉट ‘अ’मधील १९ चाळींच्या जागेवर प्रस्तावित १२ पुनर्वसन इमारतींपैकी ३ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत चाळींतील रहिवाशांचे तात्पुरत्या संक्रमण शिबिरात स्थलांतरण करण्यात आले आहे. चाळीतील रहिवाशांना भाडे किंवा संक्रमण गाळे यापैकी पर्याय निवडण्याचा विकल्प आहे.  

Web Title : मुंबई बीडीडी चॉल निवासियों को 500 वर्ग फीट के मुफ्त घर मिलेंगे।

Web Summary : नायगांव बीडीडी चॉल के 864 पात्र निवासियों को 500 वर्ग फीट के घर मिलेंगे। वितरण में पुलिस कर्मियों के लिए अपार्टमेंट शामिल हैं। परियोजना पुनर्वास के लिए 65% भूमि का उपयोग करती है, तंग जगहों में रहने वालों को मुफ्त घर प्रदान करती है।

Web Title : Mumbai BDD Chawl residents to get 500 sq ft free homes.

Web Summary : 864 eligible residents of Naigaon BDD Chawl will receive 500 sq ft homes. The distribution includes apartments for police personnel. The project uses 65% of land for rehabilitation, providing free homes to those living in cramped spaces.