मराठी भाषादिनी भाषा अनिवार्यतेचा कायदा संमत होणार - सुभाष देसाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 06:08 AM2020-01-24T06:08:19+5:302020-01-24T06:08:50+5:30

राज्य शासन इंग्रजी माध्यमांच्या शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत येत्या अधिवेशनात कायदा करणार आहे.

Law on language imperative will be passed on Marathi Language Day - Subhash Desai | मराठी भाषादिनी भाषा अनिवार्यतेचा कायदा संमत होणार - सुभाष देसाई

मराठी भाषादिनी भाषा अनिवार्यतेचा कायदा संमत होणार - सुभाष देसाई

Next

मुंबई : राज्य शासन इंग्रजी माध्यमांच्या शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत येत्या अधिवेशनात कायदा करणार आहे. त्यासाठी विधी व न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग, भाषा विभागाची नुकतीच बैठक घेतली. त्यांच्या सर्व सूचनांचा विचार करून हा कायदा करण्यात येईल. असे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
‘मराठी भाषेच्या भल्यासाठी’ या व्यासपीठाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले पाटील, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य दादा गोरे आदींनी त्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी ही माहिती दिली.
कायदा करताना काही उपसूचना घेतल्या जातील. २७ फेब्रुवारी रोजी हा कायदा संमत केला जाईल, असे देसाई म्हणाले.
पालिका शाळांमधील मराठी शिक्षणाचा विकास होण्यासाठी भाषा विभाग प्रयत्न करेल. मराठी वर्णमालेसंबंधी शासन आदेशासाठी विशेष बैठक घेऊन संबंधितांना सूचना दिल्या जातील, असेही देसाई यांनी या वेळी सांगितले.

विविध मागण्यांवर चर्चा
सांस्कृतिक कार्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री आणि मराठी भाषा या विभागांच्या समन्वयातून मराठी भाषेच्या विकासासाठी सातत्याने संवाद व्हावा, विभागाला आर्थिक तरतूद भरघोस असावी यासारख्या विविध मागण्यांवर चर्चा आली.

Web Title: Law on language imperative will be passed on Marathi Language Day - Subhash Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.