Law, conducting separate exams for BPED CET, announcing new dates from Idol | विधि, बीपीएड सीईटीसाठी स्वतंत्र परीक्षांचे आयोजन, आयडॉलकडून नवीन तारखा जाहीर

विधि, बीपीएड सीईटीसाठी स्वतंत्र परीक्षांचे आयोजन, आयडॉलकडून नवीन तारखा जाहीर

मुंबई : आयडॉलच्या पदव्युत्तर शाखेची परीक्षा २ नोव्हेंबरला होणार आहे. मात्र त्याच दिवशी विधि शाखेची सीईटी आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आयडॉलने २, ३ व ४ नोव्हेंबर २०२० रोजी होणाऱ्या विधि व बीपीएड या सीईटी देणाऱ्यांसाठी ६, ७, ९ नोव्हेंबर २०२० या दिवशी स्वतंत्र परीक्षांचे आयोजन केले आहे.

विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव, परीक्षेचे नाव, आसन क्रमांक, ईमेल, मोबाइल क्रमांक व पेपरचे नाव इत्यादी माहिती मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) दिलेल्या onlineexam2020@idol.mu. ac.in या ईमेलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, दोन्ही परीक्षा एकत्र येत असल्याने तारखांमध्ये बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह मनविसेचे मुंबई विद्यापीठ अध्यक्ष अ‍ॅड. संतोष धोत्रे यांनी केली होती.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Law, conducting separate exams for BPED CET, announcing new dates from Idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.