CoronaVirus News: बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ; कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांना विमा कवच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 02:22 AM2020-05-30T02:22:37+5:302020-05-30T06:10:17+5:30

आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच आता कोरोना संबंधित कर्तव्य बजावत असलेल्या इतर कर्मचाºयांनाही ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले आहे.

 A large increase in the honorarium of bonded doctors; Coverage of Corona Warrior employees | CoronaVirus News: बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ; कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांना विमा कवच

CoronaVirus News: बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ; कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांना विमा कवच

Next

मुंबई : बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टरांचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रित डॉक्टरांना ६० हजारांऐवजी ७५ हजार, विशेषज्ञ डॉक्टरांना ७० हजारांऐवजी ८५ हजार, इतर भागातील एमबीबीएस डॉक्टरांना ५५ हजारांऐवजी ७० हजार आणि विशेषज्ञ डॉक्टरांना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येईल.

आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच आता कोरोना संबंधित कर्तव्य बजावत असलेल्या इतर कर्मचाºयांनाही ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले आहे. अशा कर्मचाºयांचा कोरोनामुळे कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत देण्यात येईल. मात्र त्यासाठी काही अटी असतील. राज्य शासनाने शुक्रवारी याबाबतचा आदेश काढला.

आदेशातील अटीनुसार कर्मचारी त्यांच्या इस्पितळात दाखल होण्याच्या अथवा मृत्युच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर असला पाहिजे, तसे जिल्हाधिकारी व विभागप्रमुखांनी प्रमाणित करायला हवे. मृत्यू हा कोरोनाने झाला आहे. याबाबतची खातरजमा ही शासकीय/पालिका/महापालिका, आयसीएमआर नोंदणीकृत खासगी इस्पितळे, प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या/प्रमाणपत्राच्या आधारे करण्यात येईल. तसेच नियमित कर्मचाºयांनाबरोबरच कंत्राटी, बाह्य स्रोतांद्वारे घेतलेले, रोजंदारी, मानसेवी कर्मचारी यांचा कोरोनाबाबत कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांनाही ही मदत दिली जाईल.

कर्तव्य बजावणाºयांना शासनाची मदत

कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदतकार्य यांच्याशी संबंधित कर्तव्य बजावत असताना शासनाच्या विविध विभागातील व विविध प्रवर्गातील कर्मचाºयांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास ही मदत देण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेल्या अन्य विभागांचे कर्मचारी आदींचा समावेश असेल. आरोग्य कर्मचाºयांना असे कवच यापूर्वी प्रदान केले आहे.

Web Title:  A large increase in the honorarium of bonded doctors; Coverage of Corona Warrior employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.