उन्हामुळे १२ राज्यांमध्ये लाहीलाही; मुंबईत गुढीपाडव्याला गारपीट?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 06:09 AM2024-04-07T06:09:39+5:302024-04-07T06:09:57+5:30

७ राज्यांत पावसाची; जम्मू-काश्मीर, हिमाचलात हिमवृष्टीची शक्यता

Lahi in 12 states due to heat; Hailstorm for Gudhipadwa in Mumbai? | उन्हामुळे १२ राज्यांमध्ये लाहीलाही; मुंबईत गुढीपाडव्याला गारपीट?

उन्हामुळे १२ राज्यांमध्ये लाहीलाही; मुंबईत गुढीपाडव्याला गारपीट?

नवी दिल्ली : देशातील १२ राज्यांत उष्णतेची लाट आली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये तापमान ४३ अंशांवर पोहोचले. येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढेल, असा इशारा दिला आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, केरळ व सिक्कीममध्ये पावसाची, तर जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील काही भागांत हिमवृष्टीची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील ३३ जिल्ह्यांत गारांसह पाऊस पडू शकतो. बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. 

गुढीपाडव्याला गारपीट?
मुंबई : राज्यातील कमाल तापमानात उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येत असतानाच ७ ते १० एप्रिलदरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस व वादळी पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल, असा अंदाज आहे. 

Web Title: Lahi in 12 states due to heat; Hailstorm for Gudhipadwa in Mumbai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.