Kunal Raut: दिल्लीतून पत्र आलं, कुणाल राऊत यांची महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 17:39 IST2022-03-16T17:27:23+5:302022-03-16T17:39:27+5:30
युवा नेत्यांची प्रदेशाध्यक्ष पदासाठी (For the post of State President) चांगलीच चुरस बघायला मिळाली होती

Kunal Raut: दिल्लीतून पत्र आलं, कुणाल राऊत यांची महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी निवड
मुंबई - महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या (Maharashtra Pradesh Youth Congress) संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाकरिता कुणाल राऊत (Kunal Raut) यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्यानंतर, आज युवक काँग्रेसतर्फे कुणाल राऊत यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा औपचारिक घोषणा करण्यात आली. तसेच, राऊत यांना निवडीचे पत्रही देण्यात आले. त्यामुळे राज्यभर त्यांच्या चाहत्यांनी व युवक काँग्रेस सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
युवा नेत्यांची प्रदेशाध्यक्ष पदासाठी (For the post of State President) चांगलीच चुरस बघायला मिळाली होती. निवडणुकीकरिता प्रदेशाध्यक्ष पदाकरिता 14 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये, कुणाला राऊत यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे, कुणाल राऊत यांची महाराष्ट्र काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या स्फोटक नेतृत्वात आपण पक्ष कार्याला बळकटी द्याल. तसेच, पक्षवाढीसाठी कष्टाने काम कराल, असा मला विश्वास आहे, असेही श्रीनिवास यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
मुंबई - कुणाल राऊत यांची महाराष्ट्र काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्षपदी निवड, श्रीनिवास बीव्ही यांनी दिलं पत्र pic.twitter.com/nNPWrTv1Oh
— Lokmat (@lokmat) March 16, 2022
कोण आहेत कुणाल राऊत?
कुणाल राऊत हे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पूत्र आहेत. त्यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1989 रोजी झाला. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारण आणि समाजकारण यात रस घेण्यास सुरुवात केली. संकल्प या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास प्रारंभ केला. त्यानंतर काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरू केला. एनएसयुआयचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी 2009 पासून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते सलग दोनदा निवडणुकीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवडून आले. तसेच 2018 च्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.