‘कुंभकर्ण’ सरकारला जागे करणार; उद्धव यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:18 IST2018-12-05T05:18:17+5:302018-12-05T05:18:34+5:30

कुंभकर्णासारख्या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी २४ डिसेंबरला पंढरपुरात सभा घेणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले.

'Kumbhakarna' will wake the government; Uddhav's warning | ‘कुंभकर्ण’ सरकारला जागे करणार; उद्धव यांचा इशारा

‘कुंभकर्ण’ सरकारला जागे करणार; उद्धव यांचा इशारा

मुंबई : राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. आम्ही विभागनिहाय आढावा घेत आहोतच, पण कुंभकर्णासारख्या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी २४ डिसेंबरला पंढरपुरात सभा घेणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवसेना भवनात शिवसेना नेते, संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, समन्वयक आणि सचिवांची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीत कोणत्या विभागात काय कामे करायला हवीत, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
दुष्काळाच्या मुद्द्यावर शिवसेना नेहमीच आक्रमक असते. त्यामुळे यापुढे आमची भूमिका ‘कुंभकर्णा जागा हो’ अशी असणार आहे. पंढरपुरातील सभेसाठी शिवसेना महाराष्ट्राची ताकद लावणार आहे, असे उद्धव यांनी स्पष्ट केले. पक्षसंघटनेच्या माध्यमातून दुष्काळाबाबत स्वतंत्र कार्यक्रम राबवित, भाजपाला या मुद्द्यावर
एकटे पाडण्याचे शिवसेनेचे धोरण आहे.

Web Title: 'Kumbhakarna' will wake the government; Uddhav's warning