जगातील सर्वोत्तम रुग्णालयांत कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 08:17 IST2026-03-27T08:16:36+5:302026-03-27T08:17:11+5:30
सलग सातव्या वर्षी या जागतिक क्रमवारीत स्थान मिळवणारे हे भारतातील आघाडीचे रुग्णालय ठरले आहे.

जगातील सर्वोत्तम रुग्णालयांत कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल
मुंबई : मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने 'न्यूजवीक' आणि 'स्टॅटिस्टा' यांच्या प्रतिष्ठित 'वर्ल्डस बेस्ट हॉस्पिटल्स २०२६' यादीत स्थान मिळवून जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. विशेष म्हणजे, सलग सातव्या वर्षी या जागतिक क्रमवारीत स्थान मिळवणारे हे भारतातील आघाडीचे रुग्णालय ठरले आहे.
जगातील ३२ देशांमधील २,५०० हून अधिक रुग्णालयांच्या सर्वेक्षणातून ही निवड करण्यात आली आहे. रुग्णांचा अनुभव, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, सुरक्षिततेचे नियम आणि जागतिक तज्ज्ञांच्या शिफारसी या निकषांवर कोकिलाबेन रुग्णालयाने आपली
गुणवत्ता सिद्ध केली आहे. एआय-आधारित तपासणी, रोबोटिक सर्जरी आणि 'फुल टाइम स्पेशालिस्ट सिस्टम' यांमुळे हे रुग्णालय आधुनिक आरोग्य सेवेचा आदर्श बनले आहे.
या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि सीईओ डॉ. संतोष शेट्टी म्हणाले की, "सलग सात वर्षे या यादीत स्थान मिळवणे हा आमच्या रुग्णसेवेच्या संकल्पाचा विजय आहे. लोकांचा विश्वास आणि आमच्या कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळेच आम्ही जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देऊ शकत आहोत." आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणारी ही ओळख भारतासाठी अभिमानास्पद मानली जात आहे. (वा. प्र.)