Join us

Video: परब यांच्यावरील ED कारवाईनंतर सोमय्यांची रिॲक्शन, बोटे फिरवत एक्सप्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 17:20 IST

अनिल परब, साई रिसॉर्ट एनएक्स आणि इतर ठिकाणची १०.२० कोटी रुपयांची मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे

शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) दणका दिला आहे. ईडीकडून अनिल परब यांच्याशी निगडीत १० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अनिल परब यांची ईडीकडून चौकशी देखील झाली होती. त्यानंतर आज ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर भाजप नेते आणि वारंवार अनिल परब यांच्याविरुद्ध तक्रार देणारे माजी खासदार किरीट सोमय्यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. 

ईडीनं या कारवाई संदर्भात एक ट्विट देखील केलं आहे. यात अनिल परब, साई रिसॉर्ट एनएक्स आणि इतर ठिकाणची १०.२० कोटी रुपयांची मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. अनिल परब यांनी मात्र या कारवाईविरोधात कोर्टात जाण्याचं भाष्य केलं आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून कारवाई झाली असेल तर याबाबत मी कोर्टात दाद मागणार आहे, असं परब यांनी म्हटलं आहे. मात्र, या कारवाईनंतर किरीट सोमय्यांनी, अनिल परब यांना हिशोब द्यावाच लागणार असं म्हटलं आहे. 

अनिल परब यांना हिशोब द्यावाच लागणार, अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर ईडीनेही कारवाई सुरू केली आहे. आधी प्रॉपर्टी जप्त होणार आणि परत अनिल परब.... असे म्हणत किरीट सोमय्या  यांनी हाताची बोटे फिरवत रिएक्शन दिली. एकप्रकारे अनिल परब यांनाही तुरुंगात जावे लागणार असेच सोमय्यांना म्हणायचे होते का, अशी चर्चा त्यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर होत आहे. 

टॅग्स :अनिल परबकिरीट सोमय्याभाजपा