केरळचे आरोग्यदूत मुंबईत दाखल; सेव्हन हिल्स रुग्णालयात देणार सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 06:57 AM2020-06-02T06:57:07+5:302020-06-02T06:57:29+5:30

केरळच्या डॉक्टर व परिचारिकांचे पहिले पथक सेव्हन हिल्स रुग्णालयात पोहोचल्याची माहिती केरळचे आरोग्यमंत्री थॉमस इसाक यांनी दिली.

Kerala health envoy arrives in Mumbai; Services at Seven Hills Hospital | केरळचे आरोग्यदूत मुंबईत दाखल; सेव्हन हिल्स रुग्णालयात देणार सेवा

केरळचे आरोग्यदूत मुंबईत दाखल; सेव्हन हिल्स रुग्णालयात देणार सेवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारच्या विनंतीनंतर केरळने १०० जणांची एक टीम महाराष्ट्रात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५० जणांची पहिली टीम मुंबईत पोहोचली आहे. कोरोनाविरोधातील लढ्यात आता महाराष्ट्रातील डॉक्टरांना केरळमधल्या डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत होईल.
केरळच्या डॉक्टर व परिचारिकांचे पहिले पथक सेव्हन हिल्स रुग्णालयात पोहोचल्याची माहिती केरळचे आरोग्यमंत्री थॉमस इसाक यांनी दिली. आणखी ५० डॉक्टर्स व परिचारिकांचे पथकही लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत. सरकारने रेसकोर्ससाठी केरळवरून टीम मागवली होती. पण, आता ही संपूर्ण टीम सेव्हन हिल्स रुग्णालयासाठीच काम करणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले.
ही टीम आल्यानंतर सेव्हन हिल्स रुग्णालयावरील ताण
कमी होईल. त्यानुसार सेव्हन
हिल्स रुग्णालयामधील तसेच
इतर पालिका रुग्णालयांतील डॉक्टर, नर्स रेसकोर्स रुग्णालयात काम करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश
टोपे यांनी केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करीत त्यांनी केलेले प्रयत्न जाणून घेतले होते. महाराष्ट्रातल्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असल्याने महाराष्ट्र सरकारतर्फे मदतीसाठी डॉक्टर्स व नर्सेसची मदत करण्याची विनंती केरळ सरकारला करण्यात आली होती. त्या विनंतीनंतर केरळ सरकारने हे पथक पाठविले आहे.
देशात केरळमध्ये सर्वांत पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. केरळने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. त्यामुळे या पॅटर्नची चर्चा देशभर झाली. केरळच्या डॉक्टरांचा मुक्काम पुढचे काही दिवस सेव्हन हिल रुग्णालयात असेल.

Web Title: Kerala health envoy arrives in Mumbai; Services at Seven Hills Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.