Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगातील भांडणाचाही कराड ‘मास्टरमाईंड’, कारागृह अधीक्षकांकडे महादेव गित्तेची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 06:52 IST

Crime News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांच्या साथीदारांनी आम्हाला कारागृहात मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.

 बीड -  सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांच्या साथीदारांनी आम्हाला कारागृहात मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महादेव गित्ते, राजेश वाघमोडे यांनी कारागृह अधीक्षक यांच्याकडे तक्रारीतून केली आहे. यामुळे कारागृहात गित्ते आणि कराड गँगमध्ये राडा झाला होता, हे सिद्ध झाले आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांचे साथीदार हे बीडच्या कारागृहात आहेत तर परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील बबन गित्ते गँगमधील महादेव गित्ते आणि त्याचे साथीदारही याच कारागृहात आहेत. ३१ मार्चला या सर्वांना फोन लावण्यासाठी बरॅकमधून बाहेर काढले होते. यावेळी कराड आणि गित्ते गँग यांच्यात बाचाबाची होऊन हाणामारी झाली. परंतु, कारागृह प्रशासनाने कराडचा काहीच संबंध नसल्याचे सांगत राजेश वाघमोडे आणि सुदीप सोनवणे यांच्यात वाद झाल्याचा दावा करत गुन्हा दाखल केला. परंतु, त्याच दिवशी गित्ते आणि दुसऱ्या दिवशी बीडमधील आठवले गँग इतर जेलमध्ये हलविण्यात आली होती. परंतु, आता महादेव गित्ते याच्या तक्रारीमुळे नवा वाद निर्माण झाला असून, जेलमध्ये त्या दिवशी काय घडले? हे देखील उघड झाले आहे. दरम्यान, कारागृह अधीक्षक बक्सर मुलाणी यांना दुपारी कॉल केला. परंतु, त्यांनी फोन न घेतल्याने बाजू समजली नाही.

काय आहे तक्रारमी आणि राजेश गायकवाड असे ३१ मार्चला सकाळी बाहेर पडलो. यावेळी कराडच्या सांगण्यावरून सुदीप सोनवणे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, रघुनाथ फड, बालाजी दहिफळे, हैदर अली, लयक अली, योगेश मुंडे, जगन्नाथ फड व त्यांच्या साथीदारांनी आमच्यावर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. ती तपासून गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार बीडच्या कारागृह प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :गुन्हेगारीवाल्मीक कराडबीड