VIDEO: 'मी ड्रग्जच्या आहारी गेले होते'; कंगना राणौतचा जुना व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 19:37 IST2020-09-13T19:22:48+5:302020-09-13T19:37:03+5:30
बॉलिवूडमधील कलाकारांची ड्रग्ज चाचणी करणारी कंगना व्हिडीओमुळे अडचणीत

VIDEO: 'मी ड्रग्जच्या आहारी गेले होते'; कंगना राणौतचा जुना व्हिडीओ व्हायरल
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आक्रमक झालेली आणि बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनबद्दल सातत्यानं बोलणारी अभिनेत्री कंगना राणौत तिच्याच एका व्हिडीओमुळे अडचणीच आली आहे. एका बाजूला अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली असताना कंगनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात कंगना मी ड्रग्जच्या आहारी गेले होते, असं म्हणताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे कंगना अडचणीत येण्याची शक्यता आहे.
ज्यांना माफिया म्हणता, त्यांच्याच संरक्षणात फिरता?; राऊतांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
कंगनाचा माजी प्रियकर अध्ययन सुमननं एका मुलाखतीत कंगना ड्रग्ज घ्यायची असा उल्लेख केला होता. त्या मुलाखतीच्या आधारे राज्य सरकारनं कंगनाविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता कंगनाचाच व्हिडीओ समोर आल्यानं तपासाला वेग मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे व्हायरल झालेला व्हिडीओ कंगनानंच मार्चमध्ये सोशल मीडियावर शेअर केला होता.
'राज्यात शिवसेनेच्या चाललेल्या गुंडाराजवर मुख्यमंत्र्यांचं लक्ष असायला हवं'
“Main drug addict thi” pic.twitter.com/0m7GeVyde3
— Shivam Vij (@DilliDurAst) September 12, 2020
मी टीनेजर असताना असताना घरातून पळून गेले होते, असं कंगनानं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. आपण ड्रग्जच्या आहारी गेलो होतो, असंदेखील तिनं म्हटलं आहे. आपण कारकिर्दीत कशा प्रकारे संघर्ष केला, त्याची माहितीही कंगनानं व्हिडीओमधून दिली आहे. विचार करा मी किती धोकादायक होते, असं कंगनानं व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे.
कंगना राणौतला बीएमसीचा आणखी एक ‘जोर का झटका’, खारमधील फ्लॅटप्रकरणी पाठवली नोटीस
लॉकडाऊनच्या दिवसातील व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ मार्चमधील आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला कंगनानं नवरात्रीच्या पाचव्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनानं व्हिडीओमधून चाहत्यांना संबोधित केलं आहे. 'तुम्ही फारच कंटाळला असाल ना? उदास असाल, तणावात असाल,' असं कंगनानं चाहत्यांशी संवाद साधताना म्हटलं आहे.