Join us

कंगना रनाैत म्हणते, मी भावाच्या लग्नात व्यग्र; धार्मिक तेढ ट्विट प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 07:05 IST

पोलिसांना उत्तर

मुंबई : अभिनेत्री कंगना रनाैत आणि तिची बहीण रंगोली यांना चौकशीसाठी १० आणि ११ नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, भावाच्या लग्नात व्यग्र असल्याने या तारखांना हजर राहू शकत नसल्याचे उत्तर कंगनाने दिले.

मनालीमध्ये भाऊ अक्षत याच्या लग्नामध्ये रनाैत भगिनी व्यग्र आहेत. भावाच्या लग्नाचे कारण देत अजून एक आठवडा मुंबईत येणे शक्य नसून १५ नोव्हेंबरनंतरच येऊ शकेन, असे कंगनाने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.  रनाैत भगिनींनी केलेले ट्विट हिंदू आणि मुस्लीम बांधवांमध्ये तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

एखादी गुन्हा दाखल झालेली व्यक्ती पोलिसांसमोर हजर राहून तपासास सहकार्य करण्यास तयार असेल, तर पोलीस त्या व्यक्तीची प्रतीक्षा करू शकतात.- ॲड. विशाल सत्यप्रकाश सक्सेना,   वकील, सर्वोच्च न्यायालय

टॅग्स :कंगना राणौतपोलिस