जावेद अख्तर मानहानी प्रकरणी कंगनाचा न्यायालयात जबाब 

By रतींद्र नाईक | Updated: October 4, 2023 22:17 IST2023-10-04T22:16:39+5:302023-10-04T22:17:00+5:30

कंगनाने बुधवारी आपला जबाब नोंदवला.

kangana ranaut answer in court in javed akhtar defamation case | जावेद अख्तर मानहानी प्रकरणी कंगनाचा न्यायालयात जबाब 

जावेद अख्तर मानहानी प्रकरणी कंगनाचा न्यायालयात जबाब 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर यांच्या मानहानी प्रकरणी कंगना राणावत हिच्या विरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कंगनाने बुधवारी आपला जबाब नोंदवला.

बॉलीवूडमध्ये माफिया राज असल्याचा आरोप कंगनाने केला होता तसेच अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने गीतकार जावेद अख्तर यांचा उल्लेख इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. गीतकार जावेद अख्तर यांनी याप्रकरणी कंगना विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला. कंगनानेही अख्तर यांच्या विरोधात धमकावणे आणि अपमान केल्याची तक्रार नोंदवली आहे. बुधवारी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३१३ अन्वये जबाब नोंदवला. न्यायालयाने याप्रकरणावरील सुनावणी ३१ ऑक्टोबर पर्यंत तहकूब केली तसेच लेखी जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले.

Web Title: kangana ranaut answer in court in javed akhtar defamation case