Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाला माफी मागावीच लागेल - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 02:30 IST

संजयजी, ९ सप्टेंबरला भेटूच; कंगनाचा पलटवार

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यातील कलगीतुरा रविवारीही पाहायला मिळाला. एकीकडे कंगनाने व्हिडीओ जारी करून राऊत यांनी वापरलेल्या भाषेवर आक्षेप घेतला, तर महाराष्ट्राबद्दल अभद्र भाषा वापरली तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, अशी भूमिका संजय राऊत यांनी माध्यमांसमोर मांडली.

राऊत विरुद्ध रनौत या चकमकीत आज कंगनाने टिष्ट्वटरवर व्हिडीओ टाकून संजय राऊत यांच्यावर टीका केली. राऊत यांनी टीका करताना कंगनाच्या बापाला इथे यावे लागेल, हरामखोर असे शब्द वापल्याचाही व्हिडीओ कंगनाने शेअर केला. ‘अशी भाषा आणि त्यामागील मानसिकतेमुळे महिलांवरील अत्याचार वाढीस लागतात. त्यामुळे या देशातील महिला तुम्हाला माफ करणार नाहीत. याआधी आमिर खान, नसरुद्दीन शहा यांनी असुरक्षित वाटत असल्याचे विधान केले तेव्हा कोणी बाप काढला नाही किंवा हरामखोर म्हटले नाही.

आता मात्र हे शब्द सुचत आहेत. मी केलेली टीका ही प्रशासनावर आहे, कारभारावर आहे. ती महाराष्ट्रावरील टीका होत नाही आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे. बाकी, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे, तेव्हा भेटूच,’ असे कंगनाने आपल्या व्हिडीओत म्हटले आहे.कंगनाबद्दल वापरलेल्या भाषेबद्दल विचारले असता राऊत म्हणाले की, ‘मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल अभद्र भाषेचा उपयोग करणारा कुणीही असो, माफी मागावीच लागेल. आमच्यापैकी कुणी असेल तरीही त्याला मी माफी मागायला सांगेन. कंगनाने आधी माफी मागितली तर मी विचार करेन.’

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे! बाकी, मी ९ सप्टेंबरला मुंबई येणार आहे, तेव्हा भेटूच!- कंगना रनौत, अभिनेत्री

'मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहिले भी कई तुफानों का रूख मोड चुका हुँ..!'- संजय राऊत, खासदार, शिवसेना

टॅग्स :संजय राऊतकंगना राणौत