कांचन जाधव यांच्या कार्याचा गौरव, 'डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम भारत पुरस्कार' प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:06 IST2026-04-03T13:04:04+5:302026-04-03T13:06:09+5:30
देशाचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. कलाम यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याची भावना कांचन जाधव यांनी व्यक्त केली.

कांचन जाधव यांच्या कार्याचा गौरव, 'डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम भारत पुरस्कार' प्रदान
मुंबई - समर्पण, नवोपक्रम आणि समाजसेवा ही मूल्यं जपत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम भारत' हा मानाचा पुरस्कार यंदा कांचन जाधव (राऊत) यांना प्रदान करण्यात आला. 'मेड इन इंडिया स्वदेशी रनवे सीझन ८'अंतर्गत मुंबईतील बीकेसी येथे झालेल्या सोहळ्यात त्यांना गौरवण्यात आलं. देशाचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. कलाम यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याची भावना कांचन जाधव यांनी व्यक्त केली.
कांचन जाधव या मूळच्या देवळालीच्या असून पुण्यात स्थायिक आहेत. अभिनय, मॉडेलिंग, उद्योग-व्यवसाय आणि सामाजिक कार्यामध्ये त्या सक्रिय आहेत. या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांचा 'डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम भारत पुरस्काराने' सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे, डॉ. कलाम यांच्या कुटुंबातील सदस्य असलेले, ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे सचिव ए.पी.जे.एम. जैनुलाबुद्दीन व सहसंस्थापक डॉ. ए.पी.जे.एम.जे. सलीम कलाम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याला कांचन जाधव यांच्या मातोश्री सीमा राऊत, जीएसटीचे सह आयुक्त अजय वैद्य, दत्ता अनारसे, प्रीती बिडवई उपस्थित होते.