कमला मिल आग: ‘त्या’ एफएसआय घोटाळ्याच्या अहवालाची प्रतीक्षा अजूनही कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 03:13 AM2019-12-29T03:13:06+5:302019-12-29T03:13:21+5:30

दुर्घटनेला दोन वर्षे पूर्ण, नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड

Kamala Mill Fire: The report of 'that' FSI scam still awaits | कमला मिल आग: ‘त्या’ एफएसआय घोटाळ्याच्या अहवालाची प्रतीक्षा अजूनही कायम

कमला मिल आग: ‘त्या’ एफएसआय घोटाळ्याच्या अहवालाची प्रतीक्षा अजूनही कायम

Next

मुंबई : नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या उपाहारगृहांचे वास्तव कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेतून समोर आले़ १४ निष्पाप मुंबईकरांचा बळी घेणाºया या दुर्घटनेला रविवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु, विकास नियंत्रण नियमावली व माहिती तंत्रज्ञान धोरणाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करणाºया कमला मिल परिसराच्या चौकशीचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे.

लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील मोजो बिस्ट्रो आणि वन अबव्ह या दोन रेस्टो पबमध्ये २९ डिसेंबर २०१७ रोजी रात्री आगीचा भडका उडून १४ लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचे तीव्र पडसाद मुंबईतच नव्हेतर, संपूर्ण देशात उमटले होते़ या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून अग्निशमन, आरोग्य, परवाना आणि स्थानिक विभागातील १२ अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले़ या दुर्घटनेच्या चौकशीत मिल परिसरात मोठ्या प्रमाणात चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) घोटाळाही झाल्याचे समोर आले होते.

राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान धोरणानुसार कमला मिल परिसराला मंजूर एफएसआय अधिक १़३३ अतिरिक्त एफएसआय मिळणार होता. माहिती तंत्रज्ञान व त्याच्याशी निगडित व्यवसायासाठी या जागेचा वापर केल्यास व्यावसायिक वापरासाठी २० टक्के एफएसआय देण्यात येतो. मात्र कमला मिलमध्ये या नियमांचे उल्लंघन करीत एफएसआयचा गैरवापर आणि संरचनांमध्ये बदल केल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले़ अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या नेतृत्वाखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे़ आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे हा अहवाल पुढच्या आठवड्यात सादर होणार असल्याचे सूत्रांकडून समजते़

पाच अधिकारी निलंबित, १२ दोषी
1नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील सर्व हॉटेल्स, मॉल सज्ज होते़ परंतु, प्रत्यक्षात अशा उपाहारगृहांमध्ये ग्राहकांची सुरक्षा मात्र वाºयावर असल्याचे कमला मिल दुर्घटनेतून समोर आले़ हुक्क््याचा वापर आणि आगीचा खेळ सुरू असल्याने या रेस्टो पबमध्ये आग लागल्याचे चौकशीतून समोर आले़
3या प्रकरणात पाच अधिकाºयांना तत्काळ निलंबित करण्यात आले होते. परवाना, आरोग्य, अग्निशमन आणि स्थानिक विभागातील अधिकारी अशा एकूण १२ अधिकाºयांना दोषी ठरविण्यात आले़जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर करून पालिकेची फसवणूक केली, असा ठपका अधिकाºयांवर ठेवण्यात आला़

Web Title: Kamala Mill Fire: The report of 'that' FSI scam still awaits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.