कल्याण-डोंबिवलीतील वकीलांचा ST कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा, कल्याण डेपोत घेतल्या भेटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 06:45 PM2021-11-12T18:45:00+5:302021-11-12T18:45:13+5:30

कल्याण :  राज्यात एसटी कर्मचा-यांचा संप सुरू असून एसटी बांधवांना ठिकठिकाणाहून पाठींबा देखील मिळत आहे. अनेक जण बंद पुकारणा-या ...

Kalyan Dombivali Advocates gave support to ST employees strike | कल्याण-डोंबिवलीतील वकीलांचा ST कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा, कल्याण डेपोत घेतल्या भेटी

कल्याण-डोंबिवलीतील वकीलांचा ST कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा, कल्याण डेपोत घेतल्या भेटी

Next

कल्याण :  राज्यात एसटी कर्मचा-यांचा संप सुरू असून एसटी बांधवांना ठिकठिकाणाहून पाठींबा देखील मिळत आहे. अनेक जण बंद पुकारणा-या कर्मचा-यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील वकीलांनी सुद्धा कल्याण एसटी डेपो मधील कर्मचा-यांची भेट घेत त्यांना पाठींबा दिला. 

वकील अनिरुद्ध कुलकर्णी, प्रेरणा चव्हाण व त्यांच्या टीमने कर्मचा-यांची भेट घेतली. या लढ्यामध्ये कायदेशीर बाबींसाठी वकिलांकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन देण्यात आले. कायदेशीर मार्गाने संप करावा असा सल्लाही यावेळी देण्यात आला.कर्मचा-यांच्या समस्यां, वेतनवाढ, विलीनीकरण इत्यादी समस्या वकिलांनी जाणून घेतल्या.

याशिवाय, कोणत्याही प्रकारची कायदेशीर मदत लागली तर ती केली जाईल  असही आवर्जून सांगण्यात आलं. एसटी कर्मचा-यांनी कोरोना काळातही कामं केलं. वर्षांनुवर्ष काम करूनही म्हणावी तशी पगारवाढ त्यांना मिळत नाही , त्यांच्या मागण्या रास्त आहेत  असं मत ऍड अनिरुद्ध कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.

Web Title: Kalyan Dombivali Advocates gave support to ST employees strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.