Join us

न्या. चांदीवाल समितीचे काम लवकरच होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 01:26 IST

अनिल देशमुखांवरील आरोपांची करणार चौकशी

ठळक मुद्देपरमबीर सिंग यांनी २० मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीसंदर्भात काही आरोप केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करणारी न्या. कैलास चांदीवाल यांची एक सदस्यीय समिती लवकरच कामाकाजाला सुरुवात करणार आहे. या समितीला मंत्रालयाजवळील जुने सचिवालय इमारतीत कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी काढला.

परमबीर सिंग यांनी २० मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीसंदर्भात काही आरोप केले होते. या आरोपांची चौकशी करण्यासाठी न्या. चांदीवाल यांची समिती नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. जुने सचिवालय इमारतीत राज्य गृहरक्षक दलाच्या ताब्यात असलेल्या जागेपैकी एक हजार चौरस फूट जागा न्या. चांदीवाल समितीच्या कामकाजासाठी देण्यात आली आहे. परमबीर सिंग हे सध्या महासंचालक (गृहरक्षक दल) आहेत. न्या. चांदीवाल यांनी समितीच्या कामकाजासाठी कर्मचारीवर्ग व कार्यालयीन साहित्याची मागणी सामान्य प्रशासन विभागाकडे केली आहे.

टॅग्स :अनिल देशमुखकोरोना वायरस बातम्यागुन्हेगारी