पत्रकार पीयूष उपाध्याय यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 04:45 IST2018-10-27T04:45:48+5:302018-10-27T04:45:56+5:30

पत्रकार पीयूष उपाध्याय यांनी राहत्या घरी गळफास घेत गुरुवारी रात्री आत्महत्या केली.

Journalist Piyush Upadhyay suicides | पत्रकार पीयूष उपाध्याय यांची आत्महत्या

पत्रकार पीयूष उपाध्याय यांची आत्महत्या

मुंबई : पत्रकार पीयूष उपाध्याय यांनी राहत्या घरी गळफास घेत गुरुवारी रात्री आत्महत्या केली. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करीत अधिक तपास सुरू केला आहे.
उपाध्याय हे हिंदी दैनिकांत काम करीत होते; तसेच अभिनेता राहुल रॉय आणि विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचे व्यावसायिक व्यवस्थापकदेखील होते. मालाडच्या अस्मिता ज्योती इमारतीमध्ये पत्नी आणि कुटुंबासोबत राहणाऱ्या उपाध्याय यांनी गुरुवारी रात्री गळफास घेत आयुष्य संपविले. याबाबत मालवणी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत उपाध्याय यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
उपाध्याय यांचे त्यांच्या पत्नीशी पटत नव्हते. त्यांची सतत भांडणे व्हायची. याच नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले, अशी माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी दिली.

Web Title: Journalist Piyush Upadhyay suicides

टॅग्स :Deathमृत्यू