Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 09:27 IST

मुलाचे आधार कार्ड असले पाहिजे, त्याची निश्चिती झाली तरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित केली जाईल, असा निकष संचमान्यतेत आहे.

मुंबई : आधार पडताळणी ‘फेल’ झाली म्हणून शिक्षकांनाच ‘फेल’ करण्याची अफलातून संचमान्यता शालेय शिक्षण विभागाने आणली आहे. त्यामुळे ज्यांचे या विषयाशी घेणे-देणे नाही, अशा शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. 

मुलाचे आधार कार्ड असले पाहिजे, त्याची निश्चिती झाली तरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित केली जाईल, असा निकष संचमान्यतेत आहे. मात्र कुठे मुलांचे ठसे जुळत नाहीत, कुठे नावाचे स्पेलिंग चुकलेले असते, तर कुठे जन्मतारीख जुळत नाही. त्यामुळे ‘आधार’ असूनही अशी मुले शिक्षण विभागाच्या लेखी ‘निराधार’ होतात. इकडे विद्यार्थी 

वर्गात असूनही सरकार मात्र ‘देता आधार, का करू अंधार’, असा इशारा शिक्षकांना देत आहे. शिक्षकांनी मात्र या कामामध्ये अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले. त्याची सरकारने दखल घेण्याची मागणी केली आहे. 

१५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेनुसार विद्यार्थी संख्येपेक्षा एकही विद्यार्थी कमी असला, तरी तेथे एकही शिक्षक दिला जात नाही. तेथे विद्यार्थी असूनही संचमान्यतेमध्ये शून्य शिक्षक दिले जातात. त्यामुळे शिक्षकांवर गंडांतर येते. -जालिंदर सरोदे, शिक्षक, आदर्श विद्यालय, चेंबूर

टॅग्स :शिक्षकशिक्षक परिषदआधार कार्डविद्यार्थी