Marathi News : मुंबई : सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा यांच्या वतीने २०२५-२६ या आर्थिक वर्षात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे भरविण्यात आले. यावेळी पाच हजार १४५ उमेदवार उपस्थित होते.
वृद्ध, महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर; मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आघाडीवर
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान रोजगार मेळावे घेण्यात आले. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.यामुळे तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत झाली.
कौशल्याधारित रोजगाराला चालना मुंबई शहरातील रोजगाराच्या वाढत्या संधी
लक्षात घेता आगामी काळात अधिक व्यापक स्तरावर रोजगार मेळावे घेण्याचा मानस जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने व्यक्त केला आहे. या उपक्रमामुळे बेरोजगारांना दिलासा मिळत असून, कौशल्याधारित रोजगाराला चालना मिळत असल्याचे चित्र आहे.
उद्योजकतेबाबत मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण
सरकारच्या धोरणानुसार रोजगारनिर्मितीसोबतच युवकांना स्वयंरोजगाराकडे वळविण्यावरही भर देण्यात आला. उद्योजकतेबाबत मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगारविषयक माहिती देण्यासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. रोजगार मेळाव्यांमुळे बेरोजगार युवकांना थेट कंपन्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Summary : Mumbai's job fairs provided opportunities to over 5,000 unemployed youth in the last fiscal year. These fairs connect job seekers with employers, offering skill-based training and entrepreneurship guidance, boosting employment prospects and self-reliance.
Web Summary : मुंबई में रोजगार मेलों ने पिछले वित्तीय वर्ष में 5,000 से अधिक बेरोजगार युवाओं को अवसर प्रदान किए। ये मेले नौकरी चाहने वालों को नियोक्ताओं से जोड़ते हैं, कौशल-आधारित प्रशिक्षण और उद्यमिता मार्गदर्शन प्रदान करते हैं, जिससे रोजगार की संभावनाएं और आत्मनिर्भरता बढ़ती है।