Join us

JNU Attack : विद्यार्थ्यांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध, पार्थ पवार म्हणतात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 15:04 IST

जेएनयुमधील हल्ल्याबाबत देशभरातून संताप व्यक्त होत असून भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम

नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारी (5 जानेवारी) विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आली आहे. या हल्ल्यात २० विद्यार्थी जखमी झाले. या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांसह क्रिकेट आणि बॉलिवूडमधूनही या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही जेएनयू विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध नोंदवला.   

जेएनयुमधील हल्ल्याबाबत देशभरातून संताप व्यक्त होत असून भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली आहे. त्यानंतर, अभिनेत्री ट्विंकल खन्नानेही या हल्ल्याचा निषेध नोंदवला. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केलीय. ''जेएनयूतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांवरील हिंसक हल्ला निंदनीय आहे. सदर हल्ल्याती दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे'' अस पार्थ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय. 

दरम्यान, जेएनयूतील हल्ल्यात 20 जण जखमी झाले असून जखमींमध्ये विद्यार्थी, संघटनांचे नेते आणि शिक्षकांचाही समावेश आहे. विद्यापीठाच्या अनेक दालनांची मोडतोड करण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या हल्ल्याचे पडसात मुंबईतही दिसत असून जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आयआयटी पवईतील विद्यार्थ्यांनी फ्लॅश मॉब केला. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या घटनेचा निषेध करत आपली प्रतिक्रिया दिली.  

टॅग्स :पार्थ पवारराष्ट्रवादी काँग्रेसमुंबईजेएनयू