corona virus : उझबेकिस्तानात अडकलेल्या मराठी माणसाला जयंत पाटलांचा व्हॉट्सअ‍ॅप कॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 02:24 PM2020-03-18T14:24:55+5:302020-03-18T14:27:57+5:30

आपल्या नियोजित दौऱ्यानुसार या ३९ महाराष्ट्रीयन नागरिकांनी उझबेकिस्तान गाठले होते. मात्र, त्यांचा परतीचा मार्ग अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे. त्यामध्ये बहुतांश डॉक्टरांचा समावेश आहे

Jayant Patil's WhatsApp Call to Marathi Citizens Stuck in Uzbekistan in front of corona virus | corona virus : उझबेकिस्तानात अडकलेल्या मराठी माणसाला जयंत पाटलांचा व्हॉट्सअ‍ॅप कॉल

corona virus : उझबेकिस्तानात अडकलेल्या मराठी माणसाला जयंत पाटलांचा व्हॉट्सअ‍ॅप कॉल

Next

मुंबई - जगभरात कोरोनाचा फैलाव झाल्याने आंतरराष्ट्रीय वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्या  पार्श्वभूमीवर विदेशातील अनेक फ्लाईट्स बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, याच कालावधीत उझबेकिस्तानमध्ये जवळपास 39 भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. या हाराष्ट्रीय नागरिकांशी
कॅबिनेटमंत्री जयंत पाटील यांनी व्हॉट्सअॅपद्वारे कॉल करत संवाद साधला. तसेच, घाबरू नका, परराष्ट्र खात्याशी संपर्क करुन आपणास मायदेशी परत आणण्याचे संपूर्ण प्रयत्न करण्याचं आश्वासनही दिलं.

आपल्या नियोजित दौऱ्यानुसार या ३९ महाराष्ट्रीयन नागरिकांनी उझबेकिस्तान गाठले होते. मात्र, त्यांचा परतीचा मार्ग अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे. त्यामध्ये बहुतांश डॉक्टरांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार  शरद पवार यांनीही यासंदर्भात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना पत्र लिहले होते. त्यानंतर, त्यांच्यापैकी एक असलेल्या अभिजीत चिमण्णा यांच्याशी आज जयंत पाटील यांनी व्हॉ्टसअॅप कॉलिंगद्वारे संवाद साधला. तसेच, स्वत: शरद पवार यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. मीही जातीने लक्ष देईल, असे आश्वासन जयंत पाटील यांनी नागरिकांना दिले. तसेच, अडचण आल्यास मला कधीही कॉल करा, असे  म्हणत पाटील यांनी मराठी माणसाला धीर दिला. मंत्री जयंत पाटील यांच्या कॉलमुळे हे महाराष्ट्रीय नागरिक काहीसे रिलॅक्स झाले आहेत. मात्र, त्यांना आपल्या घराची ओढ लागली आहे.

कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सांगली, नाशिक आणि पुणे या ठिकाणचे रहिवाशी असलेले अनेक  डॉक्टर्स नियोजित पर्यटन दौऱ्यासाठी 10 मार्च रोजी उझबेकीस्तान येथे गेले आहेत. या दौऱ्यानुसार  17 मार्च रोजी त्यांचे रिटर्न तिकीट होते. मात्र, अचानकपणे त्यांना रिटर्न्स फ्लाईट उपलब्ध नसून आपण
भारतीय परराष्ट्र खात्याशी संपर्क साधा, असे सांगण्यात आले आहे. उझबेकिस्तान येथे अडकलेल्या या  39 मराठी जनांसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना पत्र लिहून या नागरिकांची देशवापसी करण्याची विनंती केली आहे. मात्र, आपण विदेशात अडकून
 पडल्याने त्यांना धास्ती लागली आहे. तर, या 39 नागरिकांचे कुटुंबीय त्यांच्या परतीच्या प्रवासाकडे डोळे लावून आहे.  

Web Title: Jayant Patil's WhatsApp Call to Marathi Citizens Stuck in Uzbekistan in front of corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.