Join us  

जयंत पाटलांनी ४८० जणांची घरवापसी केली, सांगलीतून १६ बस रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 11:28 AM

लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिथिलता दिल्यानंतर

सांगली/मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेटमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील तब्बल ४८० नागरिकांची त्यांच्या राज्यात पाठवणी केली आहे. तामिळनाडूमधील तब्बल ४८० स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटक सांगली जिल्ह्यात अडकले होते. जयंत पाटील यांनी या सर्वांची खाण्याची व वैद्यकीय तपासणीची सोय करुन सर्वांना परिवहन महामंडळाच्या बसूमधून त्यांच्या राज्यात, त्यांच्या गावी रवाना केले आहे. या सर्वांनीच पाटील यांचे आभार मानले, तसेच गावी जाण्याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.  

लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिथिलता दिल्यानंतर या सर्वच नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येत आहे. त्यासाठी, रेल्वे, बस आणि खासगी वाहनांने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परराज्यातील मजूरांना स्पेशळ श्रमिक ट्रेनच्या सहाय्याने राज्य सरकारने त्यांच्या राज्यात पाठविण्यात सुरुवात केली आहे. तर, जिल्ह्यांतर्गत ही स्थलांतरीतांची घरवापसी होत आहे. मात्र, या सर्वांना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे नेहमीच सामाजिक आणि विधायक कार्यात पुढे असतात. सांगली, कोल्हापूर पूराच्यावेळीही त्यांनी पूरग्रस्तांना मदत केली होती. जेवणाचे पॅकेट्स वाटून ते पूरग्रस्तांच्या मदतीला धावले होते. आता, लॉकडाऊ काळातही परराज्यातील नागरिकांना, स्थलांतरीतांना त्यांच्या मूळगावी पोहोचविण्यासाठी जयंत पाटील यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. परिवहन महामंडळातील १६ बसच्या मदतीने ४८० प्रवाशांना तामिळनाडूत पाठविण्यात आले. आपल्या गावी जाण्याचा आनंद या सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. 

 

राज्य सरकारच्या निर्णयामुळे लॉकडाऊनच्या तब्बल ४१ दिवसानंतर मजुरांचा स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर विविध राज्यातील मजूर राज्यातील विविध भागात अडकलेले होते. आता अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे मजूर गावी जाताना दिसत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांत किंवा इतर राज्यात प्रवास करणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. या स्थलांतरीतांची तपासणी करुन त्यांना स्वगृही पाठविण्यात येत आहे. त्यासाठी, महाराष्ट्र परिवहन मंडळानेही पुढाकार घेतला आहे.  

टॅग्स :बसचालकजयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसमुंबईसांगली