Join us

BREAKING: जयंत पाटील रुग्णालयात दाखल, अस्वस्थ वाटू लागल्यानं मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 18:43 IST

Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. राज्याची मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना अस्वस्थ वाटू लागल्यानं जयंत पाटील बैठक अर्धवट सोडून रुग्णालयामध्ये रवाना झाले. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं. पण रुटीन चेकअपसाठी जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात आल्याची माहिती समोर आली आहे. 

जयंत पाटील यांनी नुकताच पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली होती. (Jayant Patil NCP Maharashtra president Jayant Patil admitted in breach candy hospital Mumbai during cabinet meeting)

राज्याची मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना जयंत पाटीला यांना अस्वस्थ वाटू लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर जयंत पाटील स्वत: बैठकीतून बाहेर आले आणि ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा देखील होता. दरम्यान, जयंत पाटील त्यांच्या रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस