जावेद अख्तरांचा दावा: कंगनाचा अर्ज फेटाळला; मानहानी दावा प्रकरणी विनंती अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 11:07 IST2022-03-10T11:07:04+5:302022-03-10T11:07:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :  प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेला मानहानी दावा अंधेरी दंडाधिकारी न्यायालयातून अन्य न्यायालयात ...

Javed Akhtar's claim: Kangana's application rejected; Request for defamation suit invalid | जावेद अख्तरांचा दावा: कंगनाचा अर्ज फेटाळला; मानहानी दावा प्रकरणी विनंती अमान्य

जावेद अख्तरांचा दावा: कंगनाचा अर्ज फेटाळला; मानहानी दावा प्रकरणी विनंती अमान्य

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेला मानहानी दावा अंधेरी दंडाधिकारी न्यायालयातून अन्य न्यायालयात वर्ग करावा, यासाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने केलेला अर्ज सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळला. तसेच कंगनाने अख्तरांविरोधात केलेल्या तक्रारीवरील सुनावणीही अन्य न्यायालयात वर्ग करण्याची विनंती न्यायालयाने अमान्य केली. 

दहावे महानगर दंडाधिकारी न्यायालय पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप कंगनाने अर्जाद्वारे केला आहे. आपल्याला खटल्याच्या सुनावणीस उपस्थित राहण्यापासून कायमची सवलत न देता न्यायालयाने ‘जामीनपात्र आणि अदखलपात्र गुन्ह्या’साठी आपल्यालाच अटक वॉरंट जारी करण्याची धमकी दिल्याचा आरोप कंगनाने केला आहे.

कंगनाने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली बदनामी करून समाजात प्रतिमा मलीन केल्याचे अख्तर यांनी मानहानी दाव्यात म्हटले आहे. तर कंगनाने अख्तर यांनी आपल्याला घरी बोलावून धमकाविल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.

Web Title: Javed Akhtar's claim: Kangana's application rejected; Request for defamation suit invalid