जलवाहिनीला गळती, घाटकोपर आणि कुर्ल्यातील पाणी पुरवठ्यावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 21:45 IST2025-02-28T21:44:55+5:302025-02-28T21:45:08+5:30

Mumbai News: पवई  येथील  जलवाहिनीच्या जोडणीवर मोठी गळती सुरू झाल्याने घाटकोपर आणि कुर्ला भागातील पाणी पुरवठ्यावर शनिवारी दिवसभर परिणाम होणार आहे. गळतीमुळे घाटकोपर उच्चस्तरिय जलाशयास होणारा पाणीपुरवठा पूर्णत बंद झाला आहे.

jalavaahainailaa-galatai-ghaatakaopara-anai-kauralayaataila-paanai-pauravathayaavara-parainaama | जलवाहिनीला गळती, घाटकोपर आणि कुर्ल्यातील पाणी पुरवठ्यावर परिणाम

जलवाहिनीला गळती, घाटकोपर आणि कुर्ल्यातील पाणी पुरवठ्यावर परिणाम

मुंबई - पवई  येथील  जलवाहिनीच्या जोडणीवर मोठी गळती सुरू झाल्याने घाटकोपर आणि कुर्ला भागातील पाणी पुरवठ्यावर शनिवारी दिवसभर परिणाम होणार आहे. गळतीमुळे घाटकोपर उच्चस्तरिय जलाशयास होणारा पाणीपुरवठा पूर्णत बंद झाला आहे. जलवाहिनी दुरुस्ती काम  सुरू झाल्याने पाणी पुरवठा शनिवारी सकाळी आठ पर्यन्त बंद राहणार आहे.त्यानंतर पाणी पुरवठ्याच्या दाबात काही तासासाठी फरक पडू शकतो,तसेच गढूळ पाणी येण्याचीही शक्यता आहे.त्यामुळे आठ वाजल्यानंतरही काही तास पाणी पुरवठा विस्कळीत असू शकतो. 

शुक्रवारी संध्याकाळी  पाच ते शनिवारी सकाळी आठ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणारे -पुरवठा विस्कळीत होणारे परिसर  0एन विभाग ,घाटकोपर    प्रभाग क्रमांक १२३, १२४, १२६, १२७, १२८,१३० मधील आनंदगड, शंकर मंदिर, राम नगर, हनुमान मंदिर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षा नगर, जयमल्हार नगर, खंडोबा टेकडी, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी वसाहत, वर्षा नगर टाकी (वर्षा नगर येथील शोषण टाकी व उदंचन केंद्रामार्फत वितरण होणारा संपूर्ण परिसर), ‘डी’ आणि ‘सी’ महानगरपालिका वसाहत, रायगड विभाग, गावदेवी पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर २, अमीनाबाई चाळ, कातोडी पाडा, भीम नगर, इंदिरा नगर १, अल्ताफ नगर, गेल्डा नगर, जगदुशा नगर, गोळीबार मार्ग, सेवा नगर, ओ. एन. जी. सी. वसाहत, माझगाव बंदर वसाहत, गंगावाडी प्रवेशद्वार क्रमांक २, अंशतः विक्रोळी पार्क साईट परिसर (आनंदगड शोषण टाकी व उदंचन केद्राद्वारे वितरण परिसर), सिद्धार्थ नगर, साईनाथ नगर आणि पाटीदारवाडी, भटवाडी, बर्वे नगर, काजूटेकडी, न्यू दयासागर व रामजी नगर इत्यादी. 0एल विभाग,कुर्ला प्रभाग क्रमांक १५६, १५८, १५९, १६०, १६१, १६४ मधील संघर्ष नगर, खैराणी मार्ग, यादव नगर, जे. एम. एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदिर मार्ग, कुलकर्णीवाडी, सरदारवाडी, डिसुझा कंपाऊंड, अय्यप्पा मंदिर मार्ग, मोहिली जलवाहिनी, लोयलका कुंपण, परेरावाडी, इंद्र मार्केट, भानुशाली वाडी, असल्फा गाव, एन. एस. एस. मार्ग, नारायण नगर, साने गुरुजी पंपिंग, हिल क्रमांक ३, भीम नगर, आंबेडकर नगर, अशोक नगर, हिमालय सोसायटी,वाल्मिकी मार्ग,नुराणी मशीद, मुकुंद कंपाऊंड,संजय नगर, समता नगर, गैबण शाह बाबा दर्गा मार्ग,इत्यादी.   

Web Title: jalavaahainailaa-galatai-ghaatakaopara-anai-kauralayaataila-paanai-pauravathayaavara-parainaama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.