जे. जे. च्या स्त्रीरोगतज्ज्ञ राजश्री कटकेंवर मानसिक छळाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 06:37 AM2019-02-19T06:37:20+5:302019-02-19T06:37:45+5:30

सेंट्रल मार्डची चौकशी करण्याची मागणी

J. J. The accused of mental harassment of the gynecologist Rajshree Kakkan | जे. जे. च्या स्त्रीरोगतज्ज्ञ राजश्री कटकेंवर मानसिक छळाचा आरोप

जे. जे. च्या स्त्रीरोगतज्ज्ञ राजश्री कटकेंवर मानसिक छळाचा आरोप

Next

मुंबई : काही दिवसांपूर्वी कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदावरून काढून टाकल्यामुळे चर्चेत असणाऱ्या डॉ. राजश्री कटके या पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. सध्या जे. जे. रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञ पदावर असणाºया डॉ. राजश्री कटके यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणी चौकशी समिती नेमून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटनेने केली.

सेंट्रल मार्ड संघटनेने याविषयी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना लेखी निवेदन दिले आहे. जोपर्यंत आरोपांची चौकशी प्रक्रिया सुरू असेल तोपर्यंत दुसºया रुग्णालयात त्यांची बदली करण्याची मागणी केली आहे. निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ आणि कोणत्याही प्रकारच्या कामांसाठी पैशांची मागणी करणे अशा प्रकारच्या तक्रारी निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने प्रशासनाकडे केल्या आहेत. त्यामुळे डॉ. राजश्री कटके यांच्यावर चौकशी समिती बसवावी अशी मागणी पत्रात केली आहे. त्याचप्रमाणे कटके यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी मानसोपचार करावेत. शिक्षा म्हणून दुसºया ठिकाणी बदली करावी याही मागण्यांचा पत्रात समावेश आहे

याविषयी निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. लोकेश चिरवटकर यांनी सांगितले की, राज्यभरातून डॉ. कटके यांच्याविरोधात तक्रारी येत आहेत. जे. जे. रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरने तिच्यावर होणाºया छळाबाबत आम्हाला एक पत्र लिहिले आहे. त्यानुसार आम्ही तिच्या बाजूने आहोत. अनेकदा डॉ. कटके यांनी त्या मुलीला त्यांच्या घरी बोलावून घराच्या बाहेर बसविले होते. अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यावरून त्यांच्यावर चौकशी समिती बसवावी अशी मागणी केली आहे.

...तर त्या प्राध्यापकांच्या चेहºयाला काळे फासू
राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीनुसार प्राध्यापक डॉक्टरांकडून परीक्षेत पास करण्यासाठी पैशांची आणि आपल्यासाठी काहीतरी करावे अशी मागणी करतात. सेंट्रल मार्डने अशा प्राध्यापकांना अशा पद्धतीने डॉक्टरांचा छळ थांबविण्याची मागणी केली आहे. अन्यथा अशा डॉक्टरांच्या चेहेºयावर काळे फासून त्यांना जगासमोर आणू, असा इशाराही सेंट्रल मार्डने दिला आहे.

Web Title: J. J. The accused of mental harassment of the gynecologist Rajshree Kakkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.