Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेणे कठीणच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 06:02 IST

यंदाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत.

मुंबई : दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यासंदर्भात उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासमोर प्रस्ताव ठेवला होता. परंतु, दहावी, बारावीचे विषय खूप असतात. तसेच वेगवेगळ्या भाषाही असतात. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण आहे. . परिस्थितीनुसार दहावी, बारावीच्या परीक्षा कशा घ्यायच्या याची चाचपणी तज्ज्ञ व राज्य शिक्षण मंडळाकडून सुरू असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिली.

यंदाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत. या संदर्भात नुकत्याच मुंबईतील शिक्षक जयवंत कुलकर्णी यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्याच तर ५० टक्के ऑनलाइन, ५० टक्के ऑफलाइन अशा पद्धतीने घ्याव्यात, असे मत राज्यातील २४ टक्के पालकांनी व्यक्त केले, तर २१ टक्के पालकांना प्रचलित पद्धतीने परीक्षा घेतल्या जाव्यात असे मत मांडले. 

टॅग्स :वर्षा गायकवाडशाळापरीक्षा