मुलांविरोधातील अत्याचाराचा आलेख चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 01:50 AM2017-12-07T01:50:54+5:302017-12-07T01:51:29+5:30

मुलांविरोधातील गुन्ह्यांत देशभरात ११ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीतून उघड झाली. त्यात महाराष्ट्रातील परिस्थितीही चिंताजनक आहे.

The issue of atrocities against children is worrying | मुलांविरोधातील अत्याचाराचा आलेख चिंताजनक

मुलांविरोधातील अत्याचाराचा आलेख चिंताजनक

Next

मुंबई : मुलांविरोधातील गुन्ह्यांत देशभरात ११ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीतून उघड झाली. त्यात महाराष्ट्रातील परिस्थितीही चिंताजनक आहे.
राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालानुसार, राज्यामध्ये लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराचे ४ हजार ८१५ गुन्हे दाखल झाले असून, देशाच्या तुलनेत राज्य दुसºया क्रमांकावर आहे. संपूर्ण देशामध्ये लहान मुलांवर करण्यात आलेल्या अत्याचाराचे १ लाख ६ हजार ९५८ गुन्हे दाखल झाले असून, २०१५ सालच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल १३.६ टक्क्यांनी वाढले आहेत. उत्तर प्रदेश मुलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात आघाडीवर असून, मध्य प्रदेश तिसºया क्रमांकावर आहे.
क्राय-चाइल्ड राइट्स अँड यूद्वारे करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार, गेल्या दशकभरात या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय म्हणजेच, ५०० टक्क्यांची वाढ झाली आहे (२००६ मध्ये १८,९६७ तर २०१६ मध्ये १,०६,९५८ गुन्ह्यांची नोंद आहे). २०१२ ते २०१६च्या काळात ही तुलना मोठ्या प्रमाणात वाढली. क्रायच्या पॉलिसी आणि अ‍ॅडव्होकसीच्या संचालिका कोमल गणोत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे घडल्यानंतर त्याची नोंद करावी, कायद्याचा आधार घ्यावा, याबाबत लोकांमध्ये करण्यात येणाºया जागरूकतेमुळे नोंद गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली असावी, तसेच गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हे घडू शकतील, अशी परिस्थितीही मुलांच्या बाबतीत जास्त प्रमाण निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The issue of atrocities against children is worrying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा