सोशल मीडियावर कोणी पाठलाग करतोय का?; सायबर स्टॉकिंगचा धोका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 13:45 IST2026-03-22T13:45:54+5:302026-03-22T13:45:54+5:30

महिलांसह तरुणांना केले जाते लक्ष्य

is someone stalking you on social media the danger of cyber stalking | सोशल मीडियावर कोणी पाठलाग करतोय का?; सायबर स्टॉकिंगचा धोका 

सोशल मीडियावर कोणी पाठलाग करतोय का?; सायबर स्टॉकिंगचा धोका 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, त्यात सायबर स्टॉकिंग हा गंभीर आणि धोकादायक प्रकार पुढे येत आहे. मुंबई पोलिस यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

सायबर स्टॉकिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीवर इंटरनेटद्वारे सातत्याने लक्ष ठेवणे, त्याचा पाठलाग करणे किंवा त्रास देणे. यात वारंवार मेसेज, ई-मेल पाठवणे, सोशल मीडियावरील हालचालींवर पाळत ठेवणे, चॅट रूममध्ये प्रवेश करून निरीक्षण करणे अशा प्रकारांचा समावेश होतो. अनेक वेळा धमकीचे संदेशही पाठवले जातात. विशेषतः महिला, लहान मुले आणि भावनिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती हे या गुन्ह्याचे मुख्य बळी ठरत असल्याचे समोर आले आहे.

एक ना अनेक प्रकार

सायबर स्टॉकिंगचे प्रकारही विविध आहेत. बनावट प्रोफाइल तयार करून संपर्क साधणे (कॅटफिशिंग), सोशल मीडियावरील लोकेशन आणि पोस्ट्सवर लक्ष ठेवणे, गुगल मॅप्स स्ट्रीट व्ाद्वारे परिसराची माहिती मिळवणे, वेबकॅम हॅकिंग, स्टॉकरवेअरद्वारे हालचाली ट्रॅक करणे आणि फोटोमधील जिओटॅग्सचा वापर करून स्थान शोधणे असे अनेक मार्ग गुन्हेगार वापरत आहेत.

खबरदारी घेतल्यास धोका टळेल

तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, सुमारे ७५ टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये महिलांनाच लक्ष्य केले जाते. यामागे लैंगिक छळ, एकतर्फी प्रेम, सूडभावना किंवा अहंकार ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

सायबर स्टॉकिंग हा केवळ त्रासदायक नाहीतर गंभीर 3 गुन्हा असून, वेळेत खबरदारी घेतल्यास मोठा धोका टाळता येऊ शकतो, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

काय काळजी घ्याल?

पोलिसांनी नागरिकांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सोशल मीडियावरील गोपनीयता सेटिंग्ज मजबूत ठेवाव्यात, अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती शेअर करू नये, पत्ता किंवा मोबाईल क्रमांक सार्वजनिक करू नये, मजबूत पासवर्ड वापरावा आणि संशयास्पद लिंक किंवा ई-मेल उघडू नयेत. तसेच कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

Web Title : क्या सोशल मीडिया पर कोई पीछा कर रहा है? साइबर स्टॉकिंग का खतरा

Web Summary : साइबर स्टॉकिंग एक बढ़ता खतरा है, जिसमें ऑनलाइन उत्पीड़न और ट्रैकिंग शामिल है। मुंबई पुलिस ने सतर्क रहने का आग्रह किया है। अपराधी नकली प्रोफाइल का उपयोग करते हैं, स्थानों को ट्रैक करते हैं और वेबकैम हैक करते हैं। महिलाएं अक्सर लक्षित होती हैं। गोपनीयता सेटिंग्स को मजबूत करें, व्यक्तिगत विवरण साझा करने से बचें और पुलिस को संदिग्ध गतिविधि की रिपोर्ट करें।

Web Title : Cyber Stalking: Are You Being Followed Online? Stay Safe!

Web Summary : Cyber stalking, a growing threat, involves online harassment and tracking. Mumbai Police urge vigilance. Criminals use fake profiles, track locations, and hack webcams. Women are frequently targeted. Strengthen privacy settings, avoid sharing personal details, and report suspicious activity to police to stay safe online.