Join us

आयपीएस अधिकाऱ्याच्या पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:48 IST

आपली सरकारमध्ये ओळख असल्याने सरकारी कोट्यातून सदनिका स्वस्तात मिळवून देतो, असे प्रलोभन दाखवत चव्हाण याने मार्च २०१५ ते एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये त्याच्या ११ साथीदारांसह २० लोकांची २४ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केली. 

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रलोभने दाखवून २४ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिस दलातील आयपीएस अधिकाऱ्याचा पती पुरुषोत्तम चव्हाण याला मंगळवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत.

आपली सरकारमध्ये ओळख असल्याने सरकारी कोट्यातून सदनिका स्वस्तात मिळवून देतो, असे प्रलोभन दाखवत चव्हाण याने मार्च २०१५ ते एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये त्याच्या ११ साथीदारांसह २० लोकांची २४ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केली. 

दुसऱ्या गुन्ह्यात गुजरातमधील सुरत येथील एका व्यावसायिकाची ७ कोटी ४२ लाखांची फसवणूक केली आहे. सरकारी कोट्यातून स्वस्तात भूखंड मिळवून देतो, तसेच नाशिकमधील पोलिस अकादमीमध्ये टी-शर्ट मिळवण्याचे कंत्राट मिळवून देतो, असे सांगत चव्हाण याने संबंधित व्यावसायिकाकडून पैसे उकळले होते.

घटस्फोटासाठी पत्नीचा अर्ज?आयपीएस अधिकारी असलेल्या चव्हाण याच्या पत्नीने यापूर्वीच त्याच्यापासून घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मानसिक त्रास, आर्थिक त्रास, तसेच त्याला असलेला मानसिक आजार यामुळे घटस्फोट घेत असल्याचे या महिला अधिकाऱ्याने म्हटले आहे.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस